Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा थर-कीडही लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा थर-कीडही लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

Teeth Whitening Tips  : स्वंयपाकघरात वापरली जाणारी हळद तुमचे दात चकमवण्यास प्रभावी ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:00 AM2024-08-15T11:00:04+5:302024-08-16T15:37:53+5:30

Teeth Whitening Tips  : स्वंयपाकघरात वापरली जाणारी हळद तुमचे दात चकमवण्यास प्रभावी ठरते.

Coconut Oil And Turmeric Teeth Whitening Tips  Is Coconut Oil And Turmeric Is Good For Teeth  | दातांवर पिवळा थर-कीडही लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा थर-कीडही लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

वेळेसह आपले दातही पिवळे पडू लागतात. दातांवर पिवळा थर जमा होतो. याव्यतिरिक्त दातांमध्ये किडसुद्धा लागते. अनेकदा दात जास्त प्रमाणात किडतात. (How To Whiten Yellow Teeth) अशा स्थितीत तुम्ही काही सोप्या टिप्सचा वापर करून दातांची साफसफाई करू सखता. स्वंयपाकघरात वापरली जाणारी हळद तुमचे दात चकमवण्यास प्रभावी ठरते. हळदीपासून तयार केलेली टुथपेस्ट  वापरल्यास दातांचा पिवळेपणा निघून पांढरेशुभ्र दात दिसू  लागतात.(Teeth Whitening  Tips Is Coconut Oil And Turmeric)

एक डेंटल वेबसाईडच्या रिपोर्टनुसार नारळाचं तेल, हळद आणि बेकींग सोडा हे मिश्रण  दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. पण दातांवर रोज बेकिंग सोडा लावू नये. बेकिंग सोड्याप्रमाणेच हळद दातांना तात्पुरते पॉलिश करते (Ref).  १ चमचे हळद, १ चमचा खोबरले तेल, १  चमचा बेकिंग सोडा हे प्रमाण एकत्र करून दातांना लावा.  याची पेस्ट बनवून नंतरही ही पेस्ट टुथब्रशवर लावून व्यवस्थित दात घासून घ्या. 

नारळाचे तेल आणि हळद यांचे मंजन तयार करा

१) नारळाचे तेल

२) हळद

३) बेकिंग सोडा 

४) लिंबू

५) टूथपेस्ट

एक छोटीशी वाटी घ्या. त्यात काही थेंब नारळाचे तेल घाला.  यात २ चिमूट हळद मिसळा, बेकिंग सोडा, लिंबाचा रस आणि टूथपेस्टही मिसळा. हे सर्व साहित्य एकजीव करून त्याचे मंजन तयार करा.  त्यानंतर  या ब्रशच्या मदतीने दात स्वच्छ  करा. जवळपास ५ ते ७ मिनिटं दात  व्यवस्थित घासून घ्या. नंतर दात पाण्याने स्वच्छ धुवा.  ज्यामुळे दातांवर अनोखी चमक येईल.

कोण म्हणतं बारीक होण्यसााठी चपाती सोडा? ५ गोष्टी करा, वजन आपोआप होईल कमी-मेंटेन राहाल

दातांना तुम्ही नारळाचं तेल आणि हळद नियमित लावू शकता. हे दोन्ही एंटी बॅक्टेरिअल पद्धतीने काम करतात. याव्यतिरिक्त लिंबू, बेकिंग सोडा हळद आणि नारळाचं तेल  हे एक्टिव्हेटरप्रमाणे काम करतात. ज्यामुळे दातांवर जमा झालेला प्लाक साफ होण्यास मदत होते. 

दातांची किड  निघून जाण्यास मदत होते

नारळाचे तेल आणि हळद दोन्ही दातांची किड कमी  करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण हळदीत एंटी इफ्लेमेटरी गुण असतात जे दातांची सूज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. या वस्तूंचा वापर करून तुम्ही घरातील इतर वस्तूही सहज साफ करू शकता. 

रोज भरपूर चालता तरी पोट कमी होईना? रस्त्याने चालताना २ गोष्टी करा, झटपट वजन कमी होईल

नारळाचे तेल आणि हळद दोन्ही ओरल हेल्थसाठी चांगले मानले जातात. ज्यामुळे तोंडात जमा झालेली घाण साफ होण्यास मदत होते. ज्यामुळे पूर्ण तोंडाची स्वच्छता होते.  याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल आणि हळदीचा वापर करू शकता. 
 

Web Title: Coconut Oil And Turmeric Teeth Whitening Tips  Is Coconut Oil And Turmeric Is Good For Teeth 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.