Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

Coconut Water Vs. Lemonade: What You Must Prefer in Summers : दोन्ही पेयांचे आपआपले फायदे आहेत; पण कोणी हे पेय प्यावे? कोणी नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 01:47 PM2024-04-11T13:47:07+5:302024-04-11T13:47:59+5:30

Coconut Water Vs. Lemonade: What You Must Prefer in Summers : दोन्ही पेयांचे आपआपले फायदे आहेत; पण कोणी हे पेय प्यावे? कोणी नाही?

Coconut Water Vs. Lemonade: What You Must Prefer in Summers | नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

लिंबू पाणी आणि नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते (Summer Special). ही दोन्ही पेय विशेषतः उन्हाळ्यात जास्त प्रमाणात प्यायली जातात (Health Tips). या ऋतूमध्ये शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याच्या सेवनाने त्वरित ऊर्जा मिळते. ही दोन्ही पेय उन्हाळ्यात आराम देतात.

नारळ आणि लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण लिंबू पाणी की नारळ पाणी, यातील सर्वात आरोग्यदायी पेय कोणते हे तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोणती पेय फायदेशीर ठरेल?(Coconut Water Vs. Lemonade: What You Must Prefer in Summers).

मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी

याबाबतची माहिती देताना पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, 'दोन्ही पेयांचे स्वतःचे फायदे आहेत. नारळ पाणी आणि लिंबू पाणी उन्हाळ्यात प्यायली जातात. परंतु काही लोकांसाठी ते हानिकारक देखील ठरू शकतात. त्यामुळे कोणासाठी काय योग्य? हे त्यांच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्यावे.'

नारळ पाण्याचे फायदे

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे. यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह आणि सोडियम आढळतात. नारळ पाणी आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. शिवाय शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. फॅट फ्री असल्याने ते हृदयासाठी खूप चांगले असते.

नारळ पाण्याचे सेवन कोणी करू नये

तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी नारळाचे पाणी पिऊ नये . नारळाचे पाणी गोड असते आणि त्यात ग्लुकोजचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन टाळावे.

लिंबू पाण्याचे फायदे

लिंबूमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक असतात. आहारतज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले असते. पण लिंबू पाणी साखरेसोबत पिऊ नये. लिंबूपाणी अनेकदा उन्हाळ्यात घरात बनवले जाते. यामध्ये जास्त साखर वापरली जाते. जे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे शक्यतो बिनासाखरेचा ज्यूस तयार करून प्या.

बॅड कोलेस्टेरॉल ते वेट लॉस : 'ही' दाक्षिणात्य पांढरी चटणी खाल्ल्याने शरीराला मिळतील ५ फायदे

दोन्हींपैकी कोणते पेय चांगले आहे?

नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दोन्हीमध्ये जवळजवळ समान पोषक असतात. दोघांचेही जवळपास समान फायदे आहेत. 

Web Title: Coconut Water Vs. Lemonade: What You Must Prefer in Summers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.