Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

Side Effects Of Seating In AC For Long Time: एसी लावलेल्या खोलीत बसून गारेगार हवा घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. पण एसीचा गारवा कायमच घेत असाल तर त्यामुळे तुम्ही इतर आजारांना आमंत्रण देऊ शकता असं तज्ज्ञ सांगत आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 09:06 AM2024-06-12T09:06:27+5:302024-06-12T09:10:02+5:30

Side Effects Of Seating In AC For Long Time: एसी लावलेल्या खोलीत बसून गारेगार हवा घ्यायला सगळ्यांनाच आवडतं. पण एसीचा गारवा कायमच घेत असाल तर त्यामुळे तुम्ही इतर आजारांना आमंत्रण देऊ शकता असं तज्ज्ञ सांगत आहेत.

Cold air of AC can be dangerous - Experts say 4 side effects of sitting in AC all the time, side effects of seating in AC for long time | एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

एसीची गारेगार हवा ठरू शकते धोकादायक- तज्ज्ञ सांगतात कायम एसीमध्ये बसण्याचे ४ दुष्परिणाम

Highlightsदिवसाचे अधिकाधिक तास एसीमध्येच बसत असाल तर त्यामुळे तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात ते पाहा...

उन्हाळ्याच्या दिवसांत आपण सगळ्यांनीच भयानक उकाडा अनुभवला. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ते बरेच जण त्याकाळात घरात दिवसरात्र एसी लावत होते. पण आता मात्र एसीचा वापर कमी करायला हवा. हल्ली घरात एसी, गाडीमध्ये एसी, ऑफिसमध्ये एसी असं बऱ्याच जणांच्या बाबतीत हाेतं. अशा लोकांनी तर आवर्जून आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं. कारण एसीची एवढी जास्त गारेगार हवा घेणं तब्येतीसाठी मानवणारं नाही असं तज्ज्ञ सांगत आहेत. दिवसाचे अधिकाधिक तास एसीमध्येच बसत असाल तर त्यामुळे तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात ते पाहा...(side effects of seating in AC for long time)

 

अधिक वेळ एसीमध्ये बसण्याचे दुष्परिणाम

१. सतत एसीमध्ये बसल्याने शुद्ध हवा मिळत नाही. त्यामुळे श्वसनासंबंधी वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.

 

डॉक्टर सांगतात डायबिटीस असेल तर पेडिक्युअर नक्की करा- बघा पेडिक्युअर करण्याचे ५ फायदे

२. सतत एसीचा वापर केल्याने हाडे कमकुवत होतात.

३. एसीमुळे घाम येत नाही. त्यामुळे त्वचेमध्ये नैसर्गिकपणे असणारा ओलावा कमी होत जातो आणि त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे सतत एसीमध्ये बसल्यास त्वचेवर कमी वयात सुरकुत्या येऊ शकतात.

 

४. सतत एसी लावलेल्या बंद खोलीमध्ये राहिल्यास बाहेरची शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. 

यावर्षी मुलांसाठी घ्या एकदम लेटेस्ट पॅटर्नचे रेनकोट, नेहमीपेक्षा खूपच वेगळे- हटके आणि बजेटमध्ये... 

५. तसेच अधिककाळ एसीमध्ये राहिल्यास सुर्यप्रकाश थेट अंगावर येत नाही. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू शकते असे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ डॉ.अनिल धुळे यांनी सांगितले. 
 

Web Title: Cold air of AC can be dangerous - Experts say 4 side effects of sitting in AC all the time, side effects of seating in AC for long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.