जरा काही हवा बदलली किंवा वातावरणात बदल. झाला तर लगेच शरीराला बरेच त्रास होतात. कधी सर्दी पडसे, तर कधी खोकला, कधी घशाशी खवखव व कधीतरी एकदमच आवाज बसतो आणि मुख्यत: या सगळ्यांवर कित्येक औषधे करून देखील म्हणावा तितकासा आराम होत नाही व त्रास सुरूच राहतो. हा त्रास लहान आणि वृद्धापर्यंत मयादित राहिला नसून तो आजकालच्या नवीन पीढीला, ऐन तरुणाईत असलेल्यांना देखील भेडसावत आहे.
हा त्रास लोकल ट्रेनपासून ते एरोप्लेनपर्यंत सगळयांमध्ये दिसून येत आहे. याचा वावर सगळीकडेच होत आहे.
या त्रासाचे मुख्य कारण आहेत. प्रदुषण आणि दुर्बल व्याधीक्षमत्व. प्रदूषण टाळण्यासाठी व आपल्या शरीरावर त्याचा परिणाम न व्हावा यासाठी खबरदारी घेणे तर गरजेचे आहे पण त्यासोबत आपल्या शरीराची व्याधी क्षमत्व (Immunity Power) वाढविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्याला व आपल्या देशाला देणगी रूपाने आयुर्वेद लाभलेला आहे.ह्या अमुल्य खजिन्यात शरीराचे स्वास्थ्य कसे टिकवणे व रोग प्रतिकार क्षमता कशा वाढविणे याची भरभरून माहिती दिली आहे / नमुद केलेली आहेत. आयुर्वेदामध्ये आहार, व्यायाम आणि विविध औषधे शरीर स्वास्थ्य व विकारशांतीसाठी सांगितले आहे.
अयोग्य आहार, चुकीची ऋतुचर्या, व्यायामाचा अभाव आणि अवेळी झोप यांचा प्रभाव आपल्या पचन संस्थेवर होतो आणि ज्यामुळे पाचन संस्था कमकुवत होते. तसेच शरीरातील पोषण नीट होत नाही. पोषण नीट न झाल्याने शरीर दुर्बल व रोग प्रतिकार क्षमता क्षीण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरिराला विविध प्रकारचे आगंतुज विकार किंवा विषाणूजन्य विकार जडण्याची शक्यता वाढते. म्हणून शरीर स्वास्थ्य व व्याधी क्षमत्व वाढण्याकरिता या वरील गोष्टींचा योग्य समन्वय गरजेचा आहे.
तसेच आपण आपल्या शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढविण्याकरिता चरक फार्मसी यांची कोफोल रेंज वापरून बलवान करू शकता.
कोफोल रेंज ही शास्त्रशुद्ध आयुर्वेदीक सिद्धांतवर आधारलेली आहेत.
यामध्ये कोफोल Chewable Tablets, कोफोल Cough syrup, कोफोल Immunity tablets तसेच Kofol Sip यांचा समावेश आहे.
Kofol Chewable Tablets हे चघळण्यासाठी आहेत घशाच्या विविध तक्रारींवर तसेच खोकल्यावर उपयुक्त आहेत.
Kofol Cough Syrup हा विविध प्रकारच्या खोकल्यासाठी उपयुक्त असे रामबाण औषध आहे.
Kofol Immunity Tablets शिंका, पडसे तसेच तुमची रोग प्रतिकारक्षमता बळकट करण्यासाठी उपयुक्त आहे.
उत्पादने तुमच्या व तुमच्या परिवाराच्या रोगप्रतिकार क्षमता वाढवून व श्वसन यंत्रणेस बळकटी देण्याकरिता उपयोगी ठरतील. तसेच तुम्हाला अभेद्य असे सुरक्षाकवच प्रदान करण्यास मदत करतील.