Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

Health Tips: जगभरात ज्या कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे, तो कॅन्सर नेमका कोणता आणि काय आहेत त्याची लक्षणं 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 17:03 IST2024-12-14T17:02:58+5:302024-12-14T17:03:57+5:30

Health Tips: जगभरात ज्या कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे, तो कॅन्सर नेमका कोणता आणि काय आहेत त्याची लक्षणं 

colon cancer cases are raising in world, symptoms of colon cancer, main reasons of colon cancer | तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

तरुणाईमध्ये वाढते आहे 'या' कॅन्सरचे प्रमाण! कॅन्सरचा हा कोणता प्रकार, कशी ओळखायची लक्षणं?

Highlightsकाही अभ्यासकांच्या मते मुळ भारतीय खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यामुळे या आजारापासून आपण लांब राहू शकतो.

प्रत्येकाचीच लाईफस्टाईल, खाण्यापिण्याचे पदार्थ यात एवढा बदल होत आहे की त्याचा परिणाम हळूहळू आपल्या आरोग्यावर दिसू लागला आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरातल्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीचा आणि आहारात झालेल्या काही ठराविक बदलांचाच एक परिणाम म्हणजे सध्या कोलन कॅन्सरचे प्रमाण जगभरातच खूप वाढले आहे (colon cancer cases are raising in world). मोठ्या आतड्यांना होणारा हा आजार असून २५ ते ४९ या वयोगटातील व्यक्तींमध्ये तो जास्त दिसत आहे (symptoms of colon cancer), असा निष्कर्ष दि लॅसेंट ऑन्कोलॉजीने प्रकाशित केलेल्या अहवालात दिला आहे.(main reasons of colon cancer) 

 

या अभ्यासात असंही म्हटलं आहे की अमेरिकेसहीत अन्य २० देशांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पण भारतासाठी सध्या तरी चांगली गोष्ट हीच की या २० देशांमध्ये भारताचा समावेश नाही. भारतात पन्नाशीनंतर या आजाराचा धोका वाढतो आहे, असं दिसून येतं.

साडी नेसल्यावर सोज्वळ लूक हवा? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा ही सगळी या आजाराची मुख्य कारणं असू शकतात, असंही त्यांनी सांगितलं आहे. काही अभ्यासकांच्या मते मुळ भारतीय खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली यामुळे या आजारापासून आपण लांब राहू शकतो. पण आता नव्या पिढीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली पुर्णपणे बदलून गेल्या आहेत. त्यांच्यावर कुठेतरी नियंत्रण आणणं गरजेचं आहे.

 

कोलन कॅन्सरची लक्षणं

१. सतत पोट दुखणं, ओटीपोटात वेदना होणं.

२. काहीही खाण्याची इच्छा न होणं आणि वजन कमी होणं.

ऑक्सिजन फेशियलचा नवा ट्रेण्ड! बाकी सगळं सोडा, सुंदर-तरुण त्वचेसाठी हा उपाय करा

३. शौचामधून रक्त पडणे.

४. बद्धकोष्ठतेचा त्रास होणे किंवा शौचाला जाऊन आल्यानंतरही पोट पुर्णपणे साफ झालं  आहे, असं न वाटणे.

५. खूप थकवा येऊन अशक्तपणा जाणवणे. 

 

Web Title: colon cancer cases are raising in world, symptoms of colon cancer, main reasons of colon cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.