Join us   

Colon Cancer : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका; वेळीच जाणून घ्या बचावाच्या ६ टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 4:29 PM

Colon Cancer : कोलन कॅन्सर तरूणांमध्ये वेगानं वाढत आहे. कारण आजकाल मुलांच्या खाण्यापिण्यात बराच बदल झाला आहे. नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड मुलं जास्त प्रमाणात खातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं.

ठळक मुद्दे कोणत्याही प्रकारचा कॅन्सर टाळण्यासाठी, आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे महत्वाचे आहे. चांगलं आरोग्य फक्त खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून मिळत नाही तर तुम्हाला त्यासाठी व्यायामाचीही आवश्यकता असते. जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले नाही. तरुणांमध्ये कोलन कॅन्सर वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तणाव.

सध्या तरूणांमध्ये कोलन कॅन्सरची समस्या वेगानं वाढत आहे. जगभरात प्रोस्टेट आणि लंग्स कॅन्सरनंतर पुरूषांमध्ये जास्तीत जास्त संख्येत कोलन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. यात २० ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या जास्त आहे. जीवनशैलीतील अनिमियतता, खाण्यापिण्यातील चुकांमुळे नकळतपणे तरूणवर्ग कोलन कॅन्सरचा शिकार होत आहे.  कोलन कॅन्सरला मलाशयाचा कॅन्सर असंसुद्धा म्हणतात. म्हणजेच ज्या भागात मल जमा होतो त्याभागात या कॅन्सरची लागण होते. साहाजिकच जर आतडे किंवा पोटाशी निगडित कॅन्सर असेल तर सगळ्यात मोठं कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे असू शकतं. 

कोलन कॅन्सर तरूणांमध्ये वेगानं वाढत आहे. कारण आजकाल मुलांच्या खाण्यापिण्यात बराच बदल झाला आहे. नैसर्गिक पदार्थापेक्षा पॅकेटबंद वस्तू, प्रोसेस्ड फूड मुलं जास्त प्रमाणात खातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होतं. याशिवाय कुटुंबात आधीच व्यक्ती आजारी असल्यानं या आजाराचा धोका वाढू शकतो. 

कोलन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे खूप सामान्य आहेत, जसे की बद्धकोष्ठता, ओटीपोटात गडबड, मलासह रक्त, मलाशयातून रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणे, भूक न लागणे इ. जर यापैकी कोणतीही लक्षणे 2 आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहिली तर आपण विलंब न करता डॉक्टरांना भेटून त्याची तपासणी करून घ्यावी.

कोलन कॅन्सरपासून बचावाच्या टिप्स

कोलन कॅन्सर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. परंतु खाण्यापिण्याच्या सवयींची यात मोठी भूमिका असते. म्हणून, आपण आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलून कोलन कॅन्सरचा धोका कमी करू शकता. 

फ्राईड किंवा जंक फूडचं सेवन करू नका

तळलेले आणि जंक फूड बनवण्यासाठी खूप तेल, तूप आणि फ्लेवरिंग रसायने वापरली जातात, जी तुमच्या शरीरात जातात आणि तुमच्या आतड्यांचं नुकसान करतात. या व्यतिरिक्त, तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर ग्रीस  (चिकटपणा) असतो, जो तुमच्या आतड्यांमध्ये जातो आणि एक थर तयार करतो आणि अनेक समस्या येथून सुरू होतात.

साखर, मीठ कमी प्रमाणात खा

मीठ आणि साखर प्रत्येक घरात दैनंदिन पदार्थांमध्ये वापरली जाते. घरगुती अन्न ठीक आहे, पण बाहेरच्या पॅकेज  पदार्थात भरपूर मीठ आणि साखर वापरली जाते. पॅकेज केलेले स्नॅक्स, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट्स, कँडीज, सोडा ड्रिंक्स इत्यादींमध्ये भरपूर मीठ किंवा साखर असते, जे आरोग्याला हानी पोहोचवते.

दारूचे सेवन कमी प्रमाणात करा

अल्कोहोल ही अशी गोष्ट आहे जी कोलन कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. म्हणून अल्कोहोलचं सेवन थांबवा किंवा खूप कमी प्या. याशिवाय रेड मीट तुमच्या कोलन कॅन्सरचा धोका वाढवते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रोसेस्ड रेड मीट खाऊ नका.

ताण तणाव नियंत्रणात ठेवा

जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठीही चांगले नाही. तरुणांमध्ये कोलन कॅन्सर वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तणाव. म्हणून, ताण कमीतकमी घ्या आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा व्यायामाची सवय लावून घ्या.

रोज व्यायाम करा

कोणत्याही प्रकारचा कॅन्सर टाळण्यासाठी, आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे महत्वाचे आहे. चांगलं आरोग्य फक्त खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून मिळत नाही तर तुम्हाला त्यासाठी व्यायामाचीही आवश्यकता असते.  म्हणून दररोज किमान 30-40 मिनिटे व्यायाम करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकर्करोग