Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

Bharti Singh Hospitalized Due To Gallbladder Surgery: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिच्यासारखा पित्ताशयात खडे (Gallbladder Stone) होण्याचा त्रास सर्वांनाच होऊ शकतो. वेळीच लक्ष दिलं नाही तर तो त्रास गंभीरही होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 05:18 PM2024-05-03T17:18:47+5:302024-05-03T17:49:51+5:30

Bharti Singh Hospitalized Due To Gallbladder Surgery: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिच्यासारखा पित्ताशयात खडे (Gallbladder Stone) होण्याचा त्रास सर्वांनाच होऊ शकतो. वेळीच लक्ष दिलं नाही तर तो त्रास गंभीरही होतो...

comedian Bharti Singh hospitalized due to gallbladder surgery, What are the causes of Gallbladder Stone | पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

Highlightsलवकरच तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. हा आजार नेमका का होतो ते बघूया..

विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत समोरच्या व्यक्तीला नेहमीच खळखळून हसविणारी भारती सिंह आज मात्र स्वत: रडत आहे आणि तिच्या कुटूंबियांना आणि चाहत्यांनाही तिने चिंतेत टाकले आहे. मागच्या काही दिवसांपासून भारतीला सतत पोट दुखण्याचा त्रास होत होता. अपचन, गॅस्ट्रो असं वाटून तिने ते दुखणं अंगावर काढलं. पण जेव्हा ते खूपच असह्य झालं तेव्हा मात्र तिला दवाखाना गाठावा लागला. ती सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झालेली असून तिच्या पित्ताशयात खडे (Gallbladder Stone) झाले आहेत, असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. हा आजार नेमका का होतो ते बघूया.. (comedian Bharti Singh hospitalized due to gallbladder surgery)

 

पित्ताशयात खडे होण्याची कारणं
(Causes of Gallbladder Stone
)

आपल्या लिव्हरमध्ये पित्त तयार होते. हे पित्त पित्ताशयात साठवले जाते. या साठवलेल्या पित्ताचा उपयोग आहारातील फॅट्सचे पचन करण्यासाठी होत असतो. जेव्हा आपल्या शरीराला फॅट्स पचविण्यासाठी पित्ताची गरज पडते, तेव्हा पित्ताशय आकुंचन पावते आणि त्यातील पित्त लहान आतड्यात जाते.

मिक्सरच्या आतला भाग स्वच्छ करणं कठीण जातं? १ सोपा उपाय- मिक्सरची फिरकी होईल चकाचक

पण जेव्हा पित्ताशयाची काम करण्याची क्षमता कमी होते, तेव्हा आकुंचन पावल्यानंतरही त्यातले सगळे पित्त बाहेर पडत नाही. ते पित्ताशयातच साचून राहते. असंच वारंवार झालं तर त्या साठून राहिलेल्या पित्ताचे खडे होतात. म्हणूनच पित्ताशयाची कार्यक्षमता उत्तम असणं गरजेचं आहे. ती का कमी होते ते पाहा...

 

पित्ताशयात खडे होण्याची कारणे

१. एजिंग- काही जणांच्या बाबतीत वाढत्या वयामुळे हा त्रास होतो.

२. जेवणाच्या वेळा ठराविक नसणे.

डाएटिंग, जीम न करताही वजन होईल कमी, फक्त ५ कामं करा, काही आठवड्यातच फरक दिसेल

३. जेवणात घरचं सात्विक अन्न घेण्यापेक्षा तेलकट, तुपकट, जंकफूड जास्त प्रमाणात असणे.

४. शारिरीक हालचाली खूप कमी असणे.

५. कमी वेळात खूप जास्त प्रमाणात वेटलॉस करणे किंवा वजन वाढणे.

६. केमोथेरपीचे उपचार

७. हिमोलॅटीक ॲनिमिया

 

Web Title: comedian Bharti Singh hospitalized due to gallbladder surgery, What are the causes of Gallbladder Stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.