पावसाळा म्हटलं की त्यासोबत पावसात भिजणं आलच. काहीवेळा आपण पावसाचा आनंद घेण्यासाठी पावसात भिजतो तर काहीवेळा छत्री नसते म्हणून भिजणं होत. अशावेळी आपण जर पावसात भिजलो तरीही आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील तितकेच महत्वाचे असते. पावसात भिजल्यानंतर आपण आपलं संपूर्ण शरीर व्यवस्थित पुसून कोरड केलं पाहिजे, असे न केल्यास आपल्याला त्वचेसंबंधित अनेक आजार होऊ शकतात. यासाठीच पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणं महत्वाचे आहे.
जर आपण आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवर रॅशेज, फंगल इन्फेक्शन, खाज येणे यांसारख्या विविध समस्या पावसाळ्यात आपल्याला त्रास देऊ शकतात. बऱ्याचदा स्त्रियांना पावसाळ्यात या समस्यांचा सामना करावा लागतो. पावसात भिजल्यानंतर ते ओले कपडे तसेच अंगावर ठेवल्यास त्या ओलाव्याने आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊ शकते. पावसाळ्यात शरीर कोरडे ठेवून, त्वचेला मोकळा श्वास घेण्याची गरज असते. परंतु पावसाळ्यात असे होत नाही. ओलाव्यामुळे होणाऱ्या या इन्फेक्शनला 'इंटरट्रिगो' असेही म्हणतात. त्वचेवर सततचा ओलावा, घाम आणि कपडे घासल्यामुळे हे घडते. त्वचा सतत ओली राहिल्याने शरीराच्या त्या भागांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि पुरळ उठणे असे प्रकार होतात. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर करू(Common Breast Fungal Infections in Women During Monsoon and Tips to Avoid Them).
पावसाळ्यात स्तनाभोवती खाज येण्याची आणि जळण्याची ही काही मुख्य कारणे आहेत...
१. स्तनाखाली येणारा घाम सुकत नाही.
२. स्वच्छतेची काळजी न घेणे.
३. अंगावर घातलेले कपडे त्वचेला घासणे.
४. बुरशीजन्य संसर्ग
५. लठ्ठपणा किंवा स्तनांचा आकार मोठा असणे.
६. कायम फिटिंगचे टाईट कपडे घालणे.
पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...
काही घरगुती उपायांचा वापर करून आपण या समस्येपासून मुक्ती मिळवू शकतो...
१. टी ट्री ऑईलने मसाज करावा :- टी ट्री ऑइलचे २ ते ३ थेंब खोबरेल तेलात मिसळा आणि ते आपल्या स्तनाभोवती लावून रोज रात्री हलक्या हातांनी मसाज करावा.
पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...
२. नारळाचे तेल :- नारळाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. एक चमचा खोबरेल तेल हलके गरम करून रोज रात्री त्वचेवर लावा. रात्रभर ते तसेच त्वचेवर राहू द्यावे.
३. लिंबाच्या रसाचा वापर करावा :- लिंबाच्या रसामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा पाणी मिसळा. त्यानंतर हे मिश्रण त्वचेवर लावून २० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे फंगल इन्फेक्शन कायमचे दूर होण्यास मदत मिळते.
पावसाळ्यात घाण पाण्यामुळे पायांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून ६ सोपे घरगुती उपाय.. पाय सांभाळा..
४. बेकिंग सोडा :- एक चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि स्तनाभोवती त्वचेवर लावा. २० ते ३० मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. जेव्हाही आपल्या त्वचेला खाज येईल तेव्हा आपण हा उपाय करु शकता.
५. कडुलिंब :- कडुलिंब हे पुरळ दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय मानला जातो. कडुलिंबाची जाडसर पेस्ट बनवा आणि त्वचेवर ३० मिनिटे तशीच लावून ठेवा. आंघोळ करण्यापूर्वी आपण दिवसातून एकदा ही कडुलिंबाची पेस्ट लावू शकता.