हिवाळ्यात गरमागरम वाफाळता चहाचा कप समोर आपल्यावर तो पिण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. थंडीच्या दिवसांत कडक गरम, आलं घातलेला चहा पिणे याहून मोठे सुखः कोणतेच नाही. आपल्याकडील बरेचसे लोक हे चहाचे चाहते आहेत, कित्येकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम, वाफाळता चहा (Common Mistake You Should Avoid While Making Tea) पिऊनच होते. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याचा (3 Common Mistakes While Making Tea) पारा वाढला की आपल्याला मस्तपैकी फक्कड कपभर चहा प्यावासा वाटतोच. आपण इतरवेळी दिवसांतून जितके कप चहा पितो, हिवाळ्यात त्याच्या दुप्पट चहाचे कप रिचवले जातात( 3 Mistakes That Most People Make When Preparing Tea).
चहा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कुणी दुधाचा चहा करतो तर कुणी पाण्याचा. कधी चहात आलं घातलं जात तर कधी वेलची. चहा करण्याच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरीही आपण सगळेच चहा करताना एक छोटीशी कॉमन चूक करतो. ज्यामुळे ही छोटीशी चुकही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. आरोग्यतज्ज्ञ रमिता कौर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहा करताना आपण कोणत्या चुका करतो आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे व्हिडीओच्या माध्यमांतून शेअर केले आहे. चहा करताना तुम्ही देखील अशा चुका करत नाहीत ना? ते एकदा पाहाच...
चहा करताना या चुका करत असाल तर वेळीच थांबा...
१. चहा तयार करताना त्यात अनेक प्रकारचे मसाले घालण्याची अनेकांना सवय असते. हिवाळ्यात चहा तयार करताना तो अगदी फक्कड आणि चवीला उत्तम व्हावा यासाठी अनेकजण त्यात वेलची, लवंग, दालचिनी यांसारखे अनेक मसाल्याचे पदार्थ घालतात. परंतु अशा प्रकारे चहामध्ये मसाल्यांचा वापर केल्याने शरीरातील पित्त दोष असंतुलित करू शकतो, ज्यामुळे पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
आजी म्हणायची ‘मोरावळा' खा, वर्षभर निरोगी राहा! पाहा मोरावळा करण्याची पारंपरिक रेसिपी...
२. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण चहामध्ये लवंग, वेलची, आलं यांसारखे अनेक मसाल्यांचे पदार्थ घालतो तेव्हा त्या चहाची चव तर अधिक सुंदर लागतेच, पण या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड फार मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो. खरंतर, चहा हे एक असे पेय आहे जे शांतपणाने आणि आरामात बसून पिण्याचे तसेच शरीराला रिलॅक्स करणारे पेय आहे. परंतु जेव्हा या चहात गरजेपेक्षा जास्त मसाले घातले जातात तेव्हा हा चहा आपल्या आरोग्याच्या छोट्या - मोठ्या कुरबुरी निर्माण करण्यास कारणीभूत ठरु शकतो.
३. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे अनेकजण चहा खूप जास्त उकळवून पितात. चहा जास्त उकळल्याने त्यात असलेले उपयुक्त अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. जास्त उकळलेल्या चहामध्ये कॅफिनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता आणि थकवा जाणवू शकतो. चहा जास्त उकळल्याने त्यातील टॅनिनचे प्रमाण जास्त वाढते, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
चहा करताना लक्षात ठेवा...
१. चहामध्ये एकाचवेळी (आले किंवा तुळस) फक्त एक ते दोनच सौम्य मसाले वापरा.
२. मसाले पाण्यात चांगले उकळवा.
३. नंतर चहा पावडर घाला, त्या नंतर दूध घाला.
४. चहा २ ते ३ मिनिटांपेक्षा जास्त उकळू नये.
५. चहा तयार झाल्यावर गाळून लगेच प्या.