सध्याची धावपळीची जीवनशैली, वाढता ताण तणाव यांमुळे सर्वांनाच झोपेच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. बराचवेळ पडून राहिल्यानंतरही रात्री अनेकांना झोप येत नाही. तर काहीजण रात्री झोपायच्या वेळेस खूप विचार करत बसतात. शांत झोप खूप कमी वेळा लागते. 18 मार्च 2022 (world sleep day) हा दिवस दर वर्षी जागतिक निद्रा दिवस म्हणून मानला जातो. कमी झोपेमुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही परिणाम होऊ शकतात. डॉ प्रशांत माखिजा (न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What are the 10 common sleep disorders?)
एक सरासरी व्यक्ती त्याच्या आयुष्यातील अंदाजे एक तृतीयांश झोपेत घालवते, तरीही झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे वेळेवर निदान न करणे आणि अपुरे उपचार घेतले जातात. झोप केवळ जगण्यासाठी आवश्यक नाही तर ती महत्त्वाची शारीरिक कार्ये करते जे शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात आणि ऊर्जा वाचवण्यास मदत करतात.
झोप स्मरणशक्ती मजबुतीकरण आणि एकत्रीकरणासाठी आवश्यक जनुक कार्य, प्रथिने संश्लेषण आणि वाढ यासाठी अत्यंत महत्वाची आहे. यासाठी झोपेच्या कमतरतेचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन्ही परिणाम जाणून घ्यायला हवेत.
अल्पकालीन परिणाम (Sleeping disorder side effects)
एकाग्रता कमी
कमजोर स्मरणशक्ती आणि निर्णय
अशक्त हात-डोळा समन्वय
चिडचिडेपणा
मनोविकार
दीर्घकालीन परिणाम:
- डायबिटीस उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो
- कमजोर प्रतिकारशक्ती
- नैराश्य, चिंता आणि मूड विकार
- वजन वाढणे
एखाद्याने स्लीप स्पेशालिस्टचा सल्ला कधी घ्यावा?
-जर तुम्हाला अनेकदा झोपेची सुरुवात करणे कठीण होत असल्यास किंवा पुरेशी झोप घेणे कठीण होत असल्यास
- रात्री 7-8 तास झोपल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नसेल किंवा जास्त थकल्यासारखं वाटत असल्यास
- रात्रीच्या झोपेच्या ७-८ तासांनंतरही तुम्हाला दिवसा जास्त झोप येत असेल तर
- जर तुमच्या बेड पार्टनरने तुम्हाला सांगितले की तुम्ही जोरात घोरत असता किंवा झोपेत असताना तुम्हाला श्वासोच्छवासात विराम येत असल्याचे लक्षात आले असेल तर