सांधेदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खास म्हणजे महिलांमध्ये अंगेदुखी वाढली आहे. (Constant neck pain, back pain, waist pain, joint pain is more common in women because)वयोमानानुसार असे त्रास होणे स्वाभाविक आहे मात्र लहान वयातही शरीराला फार वेदना जाणवतात. मग त्यासाठी काही तरी उपाय करायलाच हवेत. महिलांमध्ये लवकर हाडांची झीज होते. सगळ्यांनाच असा त्रास होतोच असे नाही मात्र अनेक महिलांना होतो. मेडीकवर हॉस्पिटल्स सारख्या साईट्सवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका.(Constant neck pain, back pain, waist pain, joint pain is more common in women because) वेळीच उपाय करा.
ऑस्टिओआर्थरायटिस हा महिलांमध्ये अगदी कॉमन असा आजार आहे. यामध्ये सांध्यातील कार्टिलेज झिजते. त्यामुळे मजबुती कमी होते. त्याचा मुख्य त्रास गुडघ्यांना होतो. तसेच कंबरदुखी वाढते. मान दुखते. हातापायाची बोटीही दुखायला लागतात. रुमेटॉइड आर्थरायटिस हा आणखी एक त्रासदायक आजार आहे. यामध्ये सांध्यांना सुज येते. तसेच सकाळच्या वेळी अंग दुखते.
महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे सांधेदुखी तसेच वाताचा त्रास सुरू होतो. मेनोपॉज दरम्यान या आजाराची शक्यता जास्त असते. त्यामुळे चाळीशी-पंन्नाशीतील महिलांचे अंग फार दुखते. आणखी एक त्रास आहे ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. त्यामध्ये तर हाडे तुटण्याची शक्यता असते. हाडं अगदी ठिसूळ होऊन जातात. तसेच त्यांची ताकद कमी होऊन झीज होते.
सांधेदुखीचं एक मुख्य कारण म्हणजे स्थुलता हे आहे. सांध्यांवरती शरीराच्या वजनाचा भार पडतो. हाडांवर सांध्यांवर ताण येतो. खास म्हणजे गुडघ्यांवर शरीराचा भार पडतो. त्यामुळे गुडघे दुखायला लागतात. वजन वाढणे हे एक कारण आहे. कॅल्शियम जीवनसत्त्व डी तसेच बी१२ हाडांसाठी गरजेचे असते. त्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळेही विविध त्रास होतात.
असे त्रास उद्भवल्यावर डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. मात्र काही घरगुती उपायही करा. जसे की आहारात बदल करा. अंजीर, बदाम सारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. तसेच कोवळ्या उन्हामध्ये फेरफटका मारा जीवनसत्त्व डी मिळेल. आहारामध्ये जवसाचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. शरीराची लवचिकता वाढवा. योगासने करा. गरम पाण्याने सांध्यांना शेक देणे आरामदायी असते. तसेच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा. वजन कमी झाल्यावरही फरक पडेल. योग्य प्रमाणात झोप घ्या. शरीराला आराम द्या.