Join us   

दाताच्या दुखण्याने हैराण? हा घ्या, केअर नाऊ-पे लॅटरचा खास पर्याय-दातदुखीवर वेळीच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 5:18 PM

Dental Care: दात दुखतो, दाताला कीड लागते अशावेळी महागडे उपचार नको म्हणून औषधोपचार टाळणं काही योग्य नाही, त्यासाठीच हा एक उत्तम पर्याय.

ठळक मुद्दे 'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे.

दातांचे दुखणे अनेकांना हैराण करते. मात्र दातांवर उपचार करुन घेताना केवळ ते परवडत नाहीत किंवा महाग वाटतात म्हणून अनेकजण उपचार लांबणीवर टाकतात. मात्र त्यामुळे दातदुखीचा त्रास वाढतो. दात काढून टाकणं हा उपाय नसतो आणि दातांची ठेवण बदलली, दात वाकडे झाले तर आपल्या अन्न चावण्याच्या तंत्रापासून स्माइल आणि चेहऱ्याच्या सौंदर्यावरही त्यामुळे परिणाम होतो. मात्र सेवांसाठी अर्थसहाय्य पुरविणाऱ्या 'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यासारख्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थानीं दंतचिकित्सा करणाऱ्या ऑर्थेस्क्वेअर क्लिनिक्स यांच्यासोबत करार केला असून त्याद्वारे आता ‘केअर नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आधी तपासणी, उपचार करून घ्या आणि नंतर उपचारांचे पैसे भरा अशी सवलत ग्राहकांना मिळते आहे.

 

ऑर्थोस्क्वेअर अंतर्गत देशभरात १०० पेक्षा जास्त डेंटल क्लिनिक आहेत. त्या क्लिनिकमधील हजारो रुग्णांना आर्थिक सेवा पुरवणाऱ्या संस्थांमार्फत झीरो कॉस्ट इएमआय देऊ करण्यात आला आहे. याविषयी सेव्हइन या संस्थेचे संस्थापक जितीन भासिन सांगतात, उत्तम दंत वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांना आम्ही एकत्र आणत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ऑर्थोकेअरसोबत काम सुरू करत आहोत. दातांसंबंधी दुखण्यांवर अनेकजण वेगवेगळे उपचार घेतात. या उपचारांचा आर्थिक ताण रुग्णांवर येऊ नये, तसेच त्यांना अधिकाधिक चांगले उपचार घेता यावेत, यासाठी आम्ही शून्य टक्के इएमआय हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

 

ऑर्थोस्क्वेअर मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिकचे संस्थापक संचालक डॉ. कुणाल शेट सांगतात, मागील १३ वर्षांपासून आम्ही देशभरातील ५ लाखांपेक्षाही जास्त रुग्णांना उत्तम दर्जाची दंत वैद्यकीय सेवा देत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या कंपन्या देऊ करत असलेल्या बहुतांश हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये दातांच्या उपचारासाठी कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही.

 

दातांच्या तक्रारी आता वाढत असून त्या महागड्याही आहेत. याचा आर्थिक ताण रुग्णांवर येतोच. त्यामुळेच याबाबतीत 'बजाज फिनान्स', ‘सेव्हइन’, 'शॉप से' यांसारख्या संस्थांनी सुरू केलेले हे काम उत्तम असून त्यांच्या 0% व्याजदर इएमआयच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णांना सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

अधिक माहितीसाठी वाचा-क्लिक करा https://www.orthosquare.com/

टॅग्स : आरोग्यदातांची काळजी