पोटाच्या निगडीत समस्या सतत उद्भवत असते. काही समस्या खाण्याच्या निगडीत असतात. तर काही बिघडलेल्या जीवनशैलीमुळे घडतात. पोट फुगणे ही समस्या लोकांमध्ये कॉमन आहे. चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना या समस्येला सर्वाधिक तोंड द्यावे लागते. अधिक करून ही समस्या रात्री उद्भवते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आपली हालचाल कमी होते, त्यामुळे पोट फुगते, आणि त्यानंतर झोपेचं खोबरं होतं. बऱ्याच लोकांना पोट फुगण्याची समस्या कमी खाल्ल्याने देखील होते. पोट फुगणे याला इंग्रजीत 'ब्लोटिंग' असे म्हणतात. वेळीच उपचार न घेतल्यास पोटदुखी आणि उलटीच्या समस्येत वाढ होते. वेळेवर जेवण पचत नाही ज्यामुळे डोकेदुखी व इतर शारीरिक आजार उद्भवू शकतात. यासाठी एक उपाय म्हणजे 'ब्लोटिंग टी'. हा चहा खास पोटाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करते.
या ब्लोटिंग चहाची रेसिपी, न्युट्रिशनिस्ट तेहरिम खान सरगानी यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅपशनमध्ये लिहलं की, ''पोटफुगणे, अपचन, मळमळ, डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरेल. हा चहा आतड्यांच्यासंबंधीत समस्यांवर कार्य करते. हे एक पारंपारिक आयुर्वेदिक चहाचे मिश्रण आहे,जे पचनाचा त्रास कमी करण्यासाठी यासह बॉडी डिटॉक्सिफिकेशनला प्रोत्साहन देते.''
ब्लोटिंग टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
- 1 टीस्पून बडीशेप
- 1 टीस्पून धणे
- 1 टीस्पून जिरे
- १ कप पाणी
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप पाणी गरम करत ठेवा. त्यात धणे, बडीशेप, जिरे टाकून पाणी गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर हे पाणी गरम करण्यासाठी ठेवा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चाळणीने पाणी आणि साहित्य वगळून काढा.
हे पाणी एका ग्लासमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे ब्लोटिंग टी पिण्यासाठी रेडी. हे आयुर्वेदिक पेय बनवण्यासाठी अगदी सोपे आहे. यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होईल. आपण हा चहा सकाळी उपाशी पोटी व जेवणाच्या १ तास आधी पिऊ शकता.