Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > काही केल्या पोट साफ होत नाही? त्वचाही कोरडी पडली? पोट साफ न होण्याकडे दुर्लक्ष पडते महागात..

काही केल्या पोट साफ होत नाही? त्वचाही कोरडी पडली? पोट साफ न होण्याकडे दुर्लक्ष पडते महागात..

Not Pooping Regularly, Constipation - Ways It Will Affect Your Body and Skin! पोट साफ होत नसल्यामुळे स्किन प्रॉब्लेमची समस्या वाढते, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 01:43 PM2023-02-20T13:43:37+5:302023-02-20T13:46:20+5:30

Not Pooping Regularly, Constipation - Ways It Will Affect Your Body and Skin! पोट साफ होत नसल्यामुळे स्किन प्रॉब्लेमची समस्या वाढते, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Constipated? It might be affecting your skin. | काही केल्या पोट साफ होत नाही? त्वचाही कोरडी पडली? पोट साफ न होण्याकडे दुर्लक्ष पडते महागात..

काही केल्या पोट साफ होत नाही? त्वचाही कोरडी पडली? पोट साफ न होण्याकडे दुर्लक्ष पडते महागात..

बद्धकोष्ठतेची समस्या सध्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. खराब लाईफस्टाईल, योग्य आहाराचे सेवन न करणे, अशा अनेक कारणांमुळे ही समस्या उद्भवते. बद्धकोष्ठतेची समस्या दीर्घकाळ टिकून राहते. अशा परिस्थितीत या समस्येमुळे मूळव्याध होण्याची शक्यताही वाढते. जर आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर, यापासून वेळीच सुटका करून घेणे गरजेचं. बद्धकोष्ठतेची समस्या सामान्य जरी वाटत असेली तरी, याचा थेट परिणाम इतर अवयांवर होतो. यासह त्वचा आणि चेहऱ्यावर देखील होतो. जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा, त्वचेच्या संबंधित समस्या उद्भवतात.

यासंदर्भात त्वचारोगतज्ञ डॉ. अमित बां‍गिया म्हणतात, ''बद्धकोष्ठतेच्या समस्येमुळे लोकांचे पोट रोज साफ होत नाही. त्यामुळे पोटाच्या आत चालू असलेल्या प्रक्रियेचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्वचेवर विविध समस्या उद्भवतात. त्यामुळे वेळीच उपचार घेणं गरजेचं''

त्वचेवरील चमक निघून जाते

पोट साफ होत नसताना आपले संपूर्ण लक्ष विचलित होते. अशावेळी त्वचेची चमक नाहीशी होते. त्वचा निस्तेज आणि डल दिसू लागते. निस्तेजपणासोबतच चेहऱ्यावर मृत त्वचेचा थरही जमा होऊ लागतो. ज्यामुळे चेहरा काळपट दिसू लागतो.

चेहऱ्यावर पुरळाची समस्या वाढते

पोट साफ न होण्याची अनेक करणे असू शकतात. पोटात घाण राहिल्याने उष्णता वाढते, त्यामुळे त्वचेवर पुरळ येतात, व घामामुळे इतर समस्या देखील उद्भवतात. यासह चेहऱ्यावर पांढरे चट्टे देखील निर्माण होतात.

त्वचेवरील छिद्र मोठे होतात

पोटातील घाण साफ होत नसल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. ज्यामुळे त्वचेवरील छिद्रे वाढतात. त्वचेची छिद्रे वाढल्‍यामुळे चेहऱ्यावर पुरळ यासह सूरकुत्या उठण्याची शक्यता निर्माण होते.

तेलकट त्वचेची समस्या वाढते

पोट साफ होत नसल्यामुळे त्वचा तेलकट होत जाते. तेलकट त्वचा दिसायला खूप चिकट दिसते. तेलकट त्वचेवर अनेकदा घाण चिकटते. त्यामुळे चेहऱ्यावर इन्फेक्शन किंवा मुरुम तयार होते.

स्कीन ड्राय होते

कधीकधी बद्धकोष्ठतेची समस्या डिहायड्रेशनमुळे वाढते.  अशा परिस्थितीत पोटही साफ होत नाही, व त्वचेत कोरडेपणा येतो. त्यामुळे दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्या. शरीराला हायड्रेटेड ठेवा. याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होईल.

Web Title: Constipated? It might be affecting your skin.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.