Constipation Cure: पुरूष असो वा महिलांसाठी बद्धकोष्ठतेची समस्या आज एक गंभीर समस्या बनली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणे अशा इतरही काही कारणांमुळे ही समस्या होते. जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे सकाळी टॉयलेटमध्ये बराच वेळ बसूनही पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा जोर लावावा लागतो. अशात दिवसभर कशातही लक्ष लागत नाही. तुम्हाला सकाळी पोट साफ न होण्याची समस्या असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आलो आहोत.
कशी दूर कराल ही समस्या?
सेलिब्रिटी योगा ट्रेनर अंशुका परवानीनं इन्स्टाग्राम हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या अंशुकानं सकाळी पोट लगेच साफ होण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. हा उपाय करून तुमची बद्धकोष्ठतेची समस्या सहज दूर होऊ शकते.
सकाळी टॉयलेटमध्ये तासंतास बसूनही पोट साफ होत नसेल तर 2 मिनिटं मलासनाच्या स्थितीत बसण्याचा सल्ला अंशुकानं दिला आहे. ती म्हणाली की, सकाळी केवळ 2 ते 3 मिनिटं या स्थितीत बसाल तर आतड्यांची मुव्हमेंट वाढते, ज्यामुळे काहीच जोर न लावताही पोट साफ होईल. आणखी चांगल्या प्रभावासाठी मलासन करत एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता.
कसं कराल मलासन?
इतरही काही उपाय
दही
दही पोटासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. एका रिसर्चनुसार, दह्यात असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच दह्यात असणाऱ्या बॅक्टेरियानेही पोटाची समस्या दूर होते. रोज दह्याचं सेवन केलं तर डायरिया आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
सफरचंद
पोट साफ करण्यासाठी रोज एक सफरचंद खायला हवं. सफरचंदात पेक्टिन, पॉलीफेनॉल आणि फायबरसारखे तत्व भरपूर असतात. जे पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पोटात असलेलं मायक्रोबायोटा व्यवस्थित काम करतं. याने पोट साफ होण्यास मदत मिळते.
कोमट पाणी आणि लिंबू
रोज सकाळी पोट साफ करण्यासाठी लिंबूपाणी पिणंही फायदेशीर ठरतं. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे पाणी प्यायल्याने आतड्यांमध्ये चिकटलेलं अन्न बाहेर निघतं.