जेवणाची वेळ चुकली किंवा बाहेरचं खाल्लं तर लगेच अनेकांना पोट साफ व्हायला त्रास होतो. पोट नीट साफ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. पोट साफ होण्यासाठी चुर्ण, गोळ्या घेतल्या तरी त्याचा तात्पुरता परिणाम जिसतो. (Constipation Gas bloating Home Remedies) परत पोटाचे त्रास उद्भवतात आणि गॅस, अपचनामुळे डोकेदुखी उद्भवते. तुम्ही रोज काय खाता त्याचप्रमाणे किती प्रमाणात खाता यावर तुमचं आतड्यांचे आरोग्य अवलंबून असते. (Hing water benefits for digestion reduce weight heart)
स्वंयपाक घरात हिंगाचा वापर रोज केला जातो. हिंग पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. औषध गुणांनी परीपूर्ण हिंग अनेक आजारांपासून लांब ठेवते. गॅस, कॉन्स्टीपेशनच्या समस्येवर हिंगाचे पाणी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी, हृदयाच्या आजारांपासून वाचण्यासाठी हिंग फायदेशीर ठरतं. हेल्थ वेबसाईटच्या मते कॅन्सर आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी हिंग फायदेशीर ठरतं. हिंगाचं पाणी पिण्याचे ५ फायदे समजून घेऊया. (Constipation Gas bloating solution)
हिंगाचं पाणी कसं तयार करायचं?
एक ग्लास पाणी गरम करून त्यात हिंग मिसळा. पाण्यात हिंग व्यवस्थित मिसळ्यानंतर याचे सेवन करा.
हिंगाचे पाणी पिण्याचे फायदे
१) हिंगाच्या पाण्यानं पचनक्रिया चांगली राहते. हिंगामुळे अपचन, पोटातील वेदना, एसिडिटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय नियमित याचे सेवन केल्यानं इरिटेबल बाउल सिंड्रोम (IBS) कमी होते. यामुळे पोटही साफ होते.
२) हिंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्याचे काम करते. हिंग तुम्हाला जळजळ, हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवू शकते.
३) हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय हिंग पचनाच्या दृष्टीनंही चांगले असते. यामुळे फुगलेलं पोट कमी होतं आणि लठ्ठपणाही वाढत नाही.
४) हिंगाचे रोज सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत होते. डायबिटीसच्या रुग्णांना हिंगाचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
५) त्वचेसाठी हिंगाचं पाणी फायदेशीर ठरतं. चेहऱ्यावर याचा लेप लावल्यानं त्वचेवर ग्लो येते याशिवाय रिंकल्स, पिंपल्ससारख्या समस्यांवरही आराम मिळतो.