Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > टॉयलेटमध्ये बराचवेळ बसून असता-पोट साफ होत नाही? 2 सोपे उपाय, पोटाचे त्रास टळतील

टॉयलेटमध्ये बराचवेळ बसून असता-पोट साफ होत नाही? 2 सोपे उपाय, पोटाचे त्रास टळतील

Constipation Gas Bloating Problem Solution : पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट न घेतल्यास  पाणी न प्यायल्यास तसंच फिजिकल एक्टिव्हीटीजच्या कमतरतेमुळे लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 04:09 PM2023-09-28T16:09:16+5:302023-09-29T11:13:59+5:30

Constipation Gas Bloating Problem Solution : पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट न घेतल्यास  पाणी न प्यायल्यास तसंच फिजिकल एक्टिव्हीटीजच्या कमतरतेमुळे लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो.

Constipation Gas Bloating Problem Solution : Ways to Reduce Bloating Quick Tips and Long Term Relief | टॉयलेटमध्ये बराचवेळ बसून असता-पोट साफ होत नाही? 2 सोपे उपाय, पोटाचे त्रास टळतील

टॉयलेटमध्ये बराचवेळ बसून असता-पोट साफ होत नाही? 2 सोपे उपाय, पोटाचे त्रास टळतील

आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये तब्येतीच्या अनेक समस्या उद्भवतात. लोक रात्री उशीरापर्यंत काम करतात आणि वेळेवर जेवत नाहीत. याचा  तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. पोटाचे विकार उद्भवतात आणि पोट साफ न होणं, गॅस होणं अशा समस्या उद्भवतात. (Ways to Reduce Bloating Quick Tips and Long-Term Relief)

पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट न घेतल्यास  पाणी न प्यायल्यास तसंच फिजिकल एक्टिव्हीटीजच्या कमतरतेमुळे लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो. गॅस म्हणजेच कॉन्स्टिपेशन असल्यास मल त्याग करण्यास त्रास होतो. (Constipation Gas Bloating Problem Solution)

सकाळी सकाळी पोट साफ न झाल्यास दिवसभर अस्वस्थ वाटतं. यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात. गॅस, एसिडिटीची समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या  चुकीच्या सवयी,  पोषक तत्वांनी परिपूर्ण डाएट न घेणं  यामुळे समस्या वाढतात. मोठ्या संख्येने तरूण लोक या समस्येचा सामना करत आहेत.

BP हाय झाले तर हार्ट अटॅक येण्यापासून कसं रोखाल? आधी ५ गोष्टी करा- तब्येत राहील चांगली

हे टाळण्यासाठी फायबर्सनी परिपूर्ण आहार घ्यायला हवा आणि हेल्दी लाईफस्टाईल असावी.  रोज कमीत कमी ३० मिनिटं व्यायाम करा. ज्यामुळे  गॅसचा त्रास टळेल. योग गुरू बाबा रामदेव यांनी कॉन्स्टिपेशनची समस्या टाळण्यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत.

साजूक तूप

पोटाच्या त्रासांवर आराम मिळवण्यासाठी साजूक तूप हा उत्तम उपाय आहे. साजूक तूपात नैसर्गिक घटक असतात  ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होत.  गॅसेस, कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून सुटका मिळते. रोज सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाण्यात १ ते २ चमचे साजूक तूप घालून प्या. नंतर थोडावेळ वॉक करा असं केल्याने पोट साफ होईल. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात एक चमचा साजूक तूप मिसळून प्या. यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होईल.

त्रिफळा आणि मनुके

आयुर्वेदीक डॉक्टर सांगतात की साजूक तुपाव्यतिरिक्त त्रिफळा चुर्ण आणि मनुके खाल्ल्याने गॅसेस,  कॉन्स्टिपेशनच्या त्रासापासून आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घालून प्यायल्याने पोट साफ होईल आणि भरभरून फायदे मिळतील. रात्री पाण्यात भिजवलेले मनुके सकाळी खाल्ल्यानेही पोट साफ होण्यास मदत होते. हे उपाय करूनही त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 
 

Web Title: Constipation Gas Bloating Problem Solution : Ways to Reduce Bloating Quick Tips and Long Term Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.