Join us   

सकाळी पोट साफ होत नाही-मल कडक होतो? दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट साफ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:35 PM

Constipation Home Remedies : मनुक्यांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यांचे दूध  प्यायल्यानं पोट लवकर साफ होण्यास मदत होते.

आरोग्य चांगले  राहण्यासाठी पोट साफ असणं फार महत्वाचे असते पोट साफ न झाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. (Stomach Health Tips)अनेकदा गॅस, पोटदुखीची समस्या वारंवार उद्भवू शकते. (Constipation Home Remedies) ३ महिन्यांपेक्षा जास्त वेळ गॅसची समस्या उद्भवल्यास तुम्हाला मुळव्याधासारखे गंभीर आजाराही होऊ शकता. ज्या लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांच्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.  (Home Remedies For Constipation Ways Ways To Get Relief)

 मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार मनुक्यांमध्ये हाय फायबर्स  आणि सोर्बिटोल असते. ज्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होण्यास मदत होते. (Ref) फायबर्समुळे  मल सहज पास होण्यास मदत होते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले की,  २०२१ च्या अभ्यासानुसार मनुक्यांच्या सेवनानं  पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय तब्येतीसाठीही उत्तम ठरतात.

कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करण्यासाठी झोपताना मनुक्यांचे दूध प्या

मनुक्यांमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यांचे दूध  प्यायल्यानं पोट लवकर साफ होण्यास मदत होते. दुधात मनुके मिसळून प्यायल्यानं पोटाच्या समस्या टाळण्यासही मदत होते. दुधात मनुके मिसळून प्यायल्याने गॅसेसच्या  त्रासापासूनही आराम मिळतो.  गरम दुधात मनुके उकळून घातल्यानं मेटाबॉलिझ्म दुरूस्त होते. जळजळ एसिडीटी होत नाही याशिवाय मल सहज बाहेर पडण्यासही मदत होते. गॅस, एसिडीटी समस्या उद्भवत नाही. मनुक्यांमधील लॅक्सेटिव्ह गुण, मल मऊ करून ते सहज बाहेर काढण्यास मदत करतात. 

मनुक्यांच्या दुधानं बाऊल मुव्हमेंट करणं सोपं होतं. पोट साफ होणंही सहज शक्य होते. यामुळे गॅसचा त्रास होत नाही. मनुक्यांचे दूध प्यायल्यानं डायजेशन चांगले राहते आणि  मुळव्याधाचा त्रासही उद्भवत नाही. मनुके आणि दुध या दोन्हींमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हे दूध प्यायल्यानं हाडं मजबूत राहण्यासही मदत होते. तुम्ही हे दूध तुपात मिसळून पिऊ शकता. यातील ब्युटिरिक एसिड पोट साफ करण्यास मदत करते. 

दुधात मनुके मिसळून कसं प्याल

झोपण्याच्या आधी १ ग्लास बिना  फॅटचे दूध घ्या. या दुधात ५ ते ६ मनुके उकळून एका ग्लासात हे दूध काढा. झोपण्याच्या अर्धा तास आधी हे दूध प्या.  तुम्ही  ४ ते ५  मनुक्यांचे पाणी भिजवून दुधाबरोबर खाऊ शकता. या दुधात साखर घालू  नका. यात तुम्ही १ टिस्पून तूप मिसळू शकता.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य