Join us   

रोज सकाळी पोट साफ होतच नाही? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ मिसळून प्या, पोट होईल साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:52 PM

Constipation Home remedies : चिया सिड्स ड्रिंक्स एक घरगुती उपाय आहे. चिया सिड्समुळे फायबर्स, प्रोटीन्स, व्हिटामीन सी यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता दूर होते. गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते.

खाण्यापिण्यातील  चुकीच्या सवयी आणि गॅस, एसिडीटीमुळे पोट साफ न होणं,  पोट साफ व्हायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात. (Health Tips) गॅसमुळे  पोटदुखी, पोट फुलणं, एसिडिटी, पचनक्रिया खराब होणं अशा समस्या उद्भवू शकतात. आपली चुकीची जीवनशैली असेल तर पोटाच्या समस्या हमखास उद्भवतात. काही आयुर्वेदीक उपाय केल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. (Chia seeds with Honey For Constipation Home remedies For Constipation) चिया सिड्स ड्रिंक्स एक घरगुती उपाय आहे. चिया सिड्समुळे फायबर्स, प्रोटीन्स, व्हिटामीन सी यांसारख्या पोषक  तत्वांची कमतरता दूर होते आणि गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते. (Constipation Home remedies)

कॉन्स्टिपेशनची समस्या का होते? (Causes Of Constipation)

फायबर्सचे प्रमाण कमी असल्यास गॅस उद्भवतो.  फायबर्सयुक्त भोजनामुळे आतड्यांमध्ये आपली जागा तयार होते. जेवण पचायला आतड्यांना मदत होते. ज्या अन्नात फायबर्सची कमतरता असते  ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवते. ऑफिसच्या  कामात लोक इतके व्यस्त असतात की युरीन जास्त वेळ थांबवून ठेवतात.

केस पातळ झालेत? चमचाभर कॉफीचा खास शाम्पू लावा; केस गळती कमी, केस होतील सिल्की-दाट

जे तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.  ज्यामुळे मुत्रमार्गाच्या समस्या उद्भवतात.  व्यक्तीने दिवसाला कमीत कमी ७ ते ८ तास झोपायला हवं. योग्य प्रमाणात झोप  न  घेतल्यास पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे गॅस,  एसिडीटीची समस्या उद्भवते.

१) २ चमचे चिया सिड्स

२)  १ कप पाणी

३) १ चमचा मध.

४) १ चमचा लिंबाचा रस

कॉन्टिपेशनची समस्या टाळण्यासाठी चिया सिड्सचे सेवन

चिया सिड्स व्यवस्थित धुवून घ्या. एक कप पाणी गरम करा आणि उकळू द्या.  गरम पाणी पाण्यात धुवून झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी तसंच सोडून द्या. चिया सिड्समध्ये फॅट्स, व्हिटामीन ए आणि पाणी भरपूर असते. ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात.

पोट सुटलंय-मांड्या मोठ्या दिसतात? १० रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय; झरझर वजन कमी होईल

मध आणि लिंबाचा रस घाला. सकाळी हे पाणी प्यायल्याने कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. चिया सिड्स ड्रिंक्समध्ये व्हिटामीन सी असते. ज्यामुळे इम्यून  सिस्टिम मजबूत होत नाही. नियमित याचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. गॅसची समस्या टाळण्यास मदत होते.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल