Join us   

Constipation Remedies : थंडीत पोट साफ व्हायला त्रास होतोय? 'हा' पदार्थ घालून चहा प्या; पचनाचे विकार राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:36 AM

Constipation Home remedies : कढीपत्त्यापासून भरपूर पोषकतत्त्वे असलेला चहा बनवून तो प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

थंडीच्या दिवसात पोटाचे त्रास अनेकांना उद्भवतात.  पोट साफ न होणं, गॅस, एसिडीटी काही केल्या कमी होत नाही.  खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे पचनाचे त्रास वाढतात. सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात कढीपत्ता अनेक गोष्टी बनवण्यासाठी वापरला जातो. हे छोटे पान जेवणाची चव वाढवते. (Health Tips) कढीपत्ता चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. कढीपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. कढीपत्ता वापरून आपण अनेक आजार टाळू शकता. कढीपत्त्यापासून भरपूर पोषकतत्त्वे असलेला चहा बनवून तो प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया कढीपत्त्याचा चहा पिण्याचे काय फायदे आहेत. (How to get relief from constipation)

कढीपत्त्याचं पाणी कसं बनवायचं

10-15 कढीपत्ता गरम पाण्यात उकळवा. चांगलं उकळल्यावर चाळून घ्या. वरून थोडे मध मिसळून प्या. अनेक समस्या दूर होतील.

रक्तातील साखर नियंत्रणार राहते

कढीपत्त्यात असलेले पोषक घटक साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हा चहा प्यायल्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात राहते. कढीपत्त्याचा चहा रोज पिणे मधुमेहामध्ये फायदेशीर ठरू शकते.

पचनक्रिया सुधारते

कढीपत्त्याचा चहा पचनासाठी फायदेशीर मानला जातो. या पानांमध्ये पाचक एंजाइम असतात. ते पचन सुधारण्याचे काम करतात. कढीपत्त्याचा चहा प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, जुलाब आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांपासून सुटका मिळते. सकाळी पोट नीट साफ होत नसेल तर कढीपत्त्याचा चहा प्यायला सुरुवात करा.

त्वचेसाठी फायदेशीर

कढीपत्त्याचा चहा त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. ते सुरकुत्या आणि बारीक रेषा काढून टाकण्यास मदत करतात. कढीपत्त्याचा चहा त्वचेच्या पेशींचे पोषण करून त्यांचं नुकसान होण्यापासून वाचवतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स