Join us   

पोट नीट साफ होत नाही, गॅस होतो? ६ उपाय, पोट रोज होईल साफ आणि सुधारेल पचन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:10 AM

Constipation Home Remedies : गॅस तयार  होणं, पोटदुखीपासून बचाव करायचा असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.

थंडीच्या दिवसात गॅस, कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढतो. बऱ्याच लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. कॉन्स्टिपेशच्या स्थितीत मल कडक होतो आणि आतड्यांना चिकटतो. (Constipation Home Remedies) मल व्यवस्थित पास न झाल्यास मुळव्याध, एनल फिशर, पोटाचे गंभीर विकार उद्भवण्याचा धोका असतो.  गॅसवर योग्य उपाय म्हणजे फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन आणि फिजिकल एक्टिव्हिज करत राहणं. गॅस तयार  होणं, पोटदुखीपासून बचाव करायचा असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to Get Rid From Constipation)

जास्तीत जास्त पाणी प्या

थंडीच्या दिवसात  पाणी पिण्याचा इच्छा होत नाही पण शरीराला हाटड्रेट ठेवण्याची गरज असते. म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवं. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार शरीराला डायड्रेट ठेवल्यानं इतर कार्यही सुरळीत होतात.  आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे.

फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन करा

हिवाळ्याच्या दिवसात लोक मैदायुक्त पदार्थ, तेलकट पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करतात. यामुळे गॅसचा त्रास वाढतो. जर तुम्हाला गॅस, कॉन्स्टिपेसनची गंभीर लक्षणं जाणवत असतील खाण्यात फायबर्ससे सेवन वाढवा. फायबर्स आतडे, मायक्रोबायोमच्या चांगल्या आरोग्याला चालना देतात. आपल्या आहारात फळ, भाज्या, डाळी, शेंगााचा समावेश करा. 

चहा कॉफीचे सेवन करा

हिवाळ्यात लोक चहा, कॉफी यांसारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचेही जास्त प्रमाणात सेवन करतात. कॅफिन शरीराला हायड्रेट ठेवते.  या सवयी सोडा आणि आहारात द्रवपदार्थांचे सेवन वाढवा.

गोड खाणं कमी करा

गुलाब जामून, गाजर हलवा, केक्स, जिलेबी असे गोड पदार्थ जास्त खाल्ल्यानं गट्स संबंधी समस्या वाढतात. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होत. याऐवजी तुम्ही कमी साखरेचा  गाजर हलवा, मूग डाळ हलवा किंवा घरी बनवलेली कमी गोड खीर खाऊ शकता. 

युरिक ॲसिडचा त्रास होतो, हिवाळ्यात नक्की खा ५ सिझनल ताज्या भाज्या

काळे मनुके

गॅसचा त्रास दूर  करण्यासाठी काळ्या मनुक्याचे सेवन करायला हवं. रात्री भिजवून काळ्या मनुक्याचे सेवन केल्यास सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. हार्वर्ड हेल्थच्या रिपोर्टनुसार काळ्या मनुक्यांमध्ये सोल्यूबल फायबर्स असतात. ज्यामुळे मल मोकळा होण्यास मदत होते. झोपण्याआधी ४ ते ५  मनुके गरम पाण्यासोबत खाऊ शकता. 

पोट कमी करायचंय? मग भात कशाला सोडायचा... आहारतज्ज्ञांनी सांगितलं भात खाण्याचं सिक्रेट

ओवा

ओवा फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर यामुळे गॅस्ट्रिक ज्यूसचं उत्पादन वाढतं. यामळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोज सकाळी एक ग्लास ओव्याचं गरम पाणी प्यायल्यानं गॅसचा  त्रास कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होते. 

टॅग्स : फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य