खाण्यापिण्यात अनियमितता, शरीरात पाणी कमी होणं, अजिबात एक्टिव्ह नसणं, शरीरात फायबर्सची कमतरता यामुळे तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. गॅस झाल्यानंतर अनेकांना मल त्याग करण्यात समस्या येतात. मल अधिकाधिक घट्ट होत जातो. (Constipation Home Remedies) एकदा मल घट्ट झाला की तासनतास टॉयलेट सीटवर बसून राहावं लागतं. तरीसुद्धा पोट साफ होत नाही अनेकदा पोटदुखीच्या वेदनाही होतात. (Warm Milk And Ghee For Constipation Relief Constipation Home Remedies)
गॅस वारंवार झाल्यानंतर मूळव्याध होण्याचा धोकाही वाढतो. कॉन्स्टीपेशन म्हणजेच पोट साफ न होण्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गरम दुधाचे सेवन करू शकता. गरम दूध प्यायल्याने गॅसेसचा त्रास कमी होण्यास मदत होते. दूधाला खाण्यापिण्याचा एक भाग बनवायला हवं. दूधात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे हाडं चांगली राहतात. (Constipation Solution)
यात व्हिटामीन्स, प्रोटीन्सबरोबरच इतर खनिजही असतात. पोटाच्या समस्या टाळण्यासाठी रात्री दूध पिण्याच सल्ला दिला जातो. रात्रीच्यावेळी एक ग्लास गरम दूधात २ चमचे तूप घालून प्यायल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. अशा प्रकारे दूध प्यायल्याने सकाळी पोट सहज साफ होते आणि मल त्याग करणं सोपं होतं.
पोट साफ होण्यासाठी सोपे घरगुती उपाय (How To Get Relief From Constipation)
1) लिंबाच्या रसाचे सेवन गॅसपासून सुटका मिळवून देण्यास प्रभावी ठरते. रात्री झोपण्याच्याआधी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून सकाळी ते प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त एक ते दोन वेळा लिंबू पाणी पिऊ शकता.गॅस झाल्यानंतर तुम्ही जितके जास्त तरल पदार्थ खाल तितका जास्त फायदा होईल. सूप, गरम पाणी, हर्बल टी, पिऊ शकता.
2) सकाळच्यावेळी एक चमचा ऑलिव्ह ऑईलचे सेवन करा यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळेल. ऑलिव्ह ऑईलमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि ल्युब्रिकेट्ंसप्रमाणे काम करते. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते, मल त्याग करणं सोपं होतं.
3) औषधी गुणांनी परिपूर्ण आल्याचे सेवन केल्यास गॅसेसच्या समस्येवर आराम मिळतो. आलं बारीक करून ते गरम पाण्यात मिसळून या चहाचे सेवन करा. आल्याचा हा हर्बल चहा प्यायल्याने गॅस याव्यतिरिक्त पोट फुगणं, भिती वाटणं या समस्या दूर होण्यास मदत होते.