Join us   

गॅसच्या त्रासानं सतत पोट फुगल्यासारखं वाटतं? ३ उपाय, कॉन्स्टीपेशन, गॅस पोटाचे त्रास होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 1:47 PM

Constipation Home remedy : अग्निसार क्रियेला अग्निसार प्राणायम असंही म्हणतात. सकाळी रिकाम्यापोटी हे आसन केल्यानं पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गॅसचा त्रासही कमी होतो. 

खाण्यापिण्याच्या चुका, जीवनशैलीतील बदल यामुळे  गॅसची समस्या उद्भवते. यामुळे तुमच्या पचनतंत्रावर आणि आतड्यांवरही परिणाम होतो. पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दीर्घकालीन मूळव्याध, फिगरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. (Constipation Home remedy) काही लोक पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर तहा, कॉफी, सिगारेट, बीडीची सवय लावून घेतात.  ही सवय  कालांतरानं गंभीर आजाराचं कारण ठरत.  योगा एक्सपर्ट्स आकाश सिंगल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर, कफपासून सुटका मिळवण्याचे काही उपाय सांगितले आहेत. (3 easy ways to relieve constipation and increase digestion)

चहा सिगारेट कसे काम करते?

चहा आणि कॉफीमध्ये कॅफेन असते. जे लॅक्सेटिव्हप्रमाणे काम करते.  हे तुमच्या आतड्यांना संकुचित करते आण पोट साफ होण्यासही मदत करते. दुसरीकडे सिगारेट बीडीमुळे पोटात गॅस तयार होतो.  ज्यामुळे चुकीच्या पद्धतीनं मल खाली सरकण्यास मदत होते. 

उषापान गॅसचे उपाय

आयुर्वेदानुसार गॅसवर उपाय करण्यासाठी आणि पचन चांगले ठेवण्यासाठी उषापान करण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचं सेवन करा. यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि आतड्यांचं संतुलन चांगलं राहतं. 

अग्नीसार

अग्निसार क्रियेला अग्निसार प्राणायम असंही म्हणतात. सकाळी रिकाम्यापोटी हे आसन केल्यानं पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय गॅसचा त्रासही कमी होतो. 

वज्रासन

पोटासाठी वज्रासन फायदेशीर आहे. यामुळे पचन वेगानं होते. २ ते ५ मिनिटं वज्रासनात राहिल्यानं आतड्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. याशिवाय या मुद्रेत बसून जेवल्यानं जेवणंही व्यवस्थित जातं. 

टॅग्स : फिटनेस टिप्सआरोग्य