Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ प्रिबायोटिक पदार्थ खा, पचनाचे विकार कायमचे दूर

गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ प्रिबायोटिक पदार्थ खा, पचनाचे विकार कायमचे दूर

Constipation Relief Foods :

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 01:42 PM2022-12-18T13:42:04+5:302022-12-18T14:11:44+5:30

Constipation Relief Foods :

Constipation Relief Foods : Nutritionist lovneet batra shared 5 healthy probiotics foods to improve gut health | गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ प्रिबायोटिक पदार्थ खा, पचनाचे विकार कायमचे दूर

गॅसमुळे पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ प्रिबायोटिक पदार्थ खा, पचनाचे विकार कायमचे दूर

आतडे आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे.   आतड्यात दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया आजारांपासून बचाव आणि  जोखिम दोन्हींसाठी कारणीभूत असतात. तब्येत चांगली ठेवण्यासाठी चांगल्या बॅक्टेरियाजची आवश्यकता असते. प्रीबायोटिक्स यासाठी फायदेशीर ठरतात. (Nutritionist lovneet batra shared 5 healthy probiotics foods to improve gut health)

इन्सुलिन, ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवल्यास आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तुमचा आहार आतड्यांतील जीवाणूंच्या वाढीवर परिणाम करतो. (Constipation Relief Foods) न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी  काही फळं खाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होते. प्रोबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पचनाचे त्रास दूर राहण्यास मदत होते. 

गट बॅक्टेरिया का गरजेचे असतात?

NCBI च्या मते, आतड्यात 100 ट्रिलियन पेक्षा जास्त सूक्ष्मजीव पेशींचा एक जटिल समुदाय असतो. हे शरीराला चांगले चयापचय, पोषण पचन आणि रोगप्रतिकारक कार्यामध्ये मदत करतात. त्याच वेळी, या जिवाणूमध्ये घट किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा जळजळ आणि लठ्ठपणा सारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोगांचा धोका वाढवू शकतो. 

लसूण

लसूण प्रीबायोटिक्सच्या स्वरूपात कार्य करते. यामुळे चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस चालना मिळते. यामुळे बॅड बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत होते. 

कांदा

कांद्यात औषधी गुणधर्म असतात आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. त्यात इन्युलिन आणि एफओएस भरपूर प्रमाणात असते. FOS आतड्यांतील वनस्पती मजबूत करते आणि पेशींमध्ये नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुमची कमकुवत प्रतिकारशक्ती वाढते.

आळशीच्या बीया

आळशीच्या बियांमध्ये म्यूसिलेज गम, सेल्यूलोज आणि लिग्निन नावाचे  फायबर्स असतात. यामुळे याला एक उत्तम प्रीबायोटिक्स मानले जाते. याच्या सेवनानं शरीरात चांगले बॅक्टेरिया वाढतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. हेल्दी वजन मेटेंन राहतं. 

केळी

केळी पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी फायदेशीर ठरते. यात भरपूर फायबर्स असतात याशिवाय इन्युसिनचं प्रमाणही असतं. त्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरीयांची वाढ होते. 

जवस

जवसात बीटी ग्लूकॉन असते. हे एक प्रीबायोटिक्स फायबर आहे. यामुळे पचनतंत्रात चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होते.  बीटी ग्लूकॉन घातक कोलेस्टेरॉल कमी करते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. 

Web Title: Constipation Relief Foods : Nutritionist lovneet batra shared 5 healthy probiotics foods to improve gut health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.