तुम्ही अनेकदा घरातील माणसांना असं म्हणताना ऐकले असेल की आज पोट नीट साफ झालं नाही किंवा पोटात दुखतंय. या सर्व स्थिती बद्धकोष्ठतेची ( Constipation remedies) समस्या दर्शवतात. बद्धकोष्ठता ही पोटाची अशी समस्या आहे ज्यामध्ये मल सहजासहजी बाहेर पडत नाही. चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे जठराची सूज अशक्त होते, त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही आणि आतड्यांसंबंधीचा त्रास होतो आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. (How to get relief from constipation instant)
पोट साफ न होण्यामागे बद्धकोष्ठता हे एकमेव कारण नाही. पण इतरही कारणे आहेत. कोलंबिया एशिया हॉस्पिटल, पालम विहार येथील जनरल फिजिशियन डॉ. मनजीता नाथ दास यांनी एका वेबसाईडशी बोलताना सांगितले की, पोट साफ न होण्याला बद्धकोष्ठता म्हणतात. बद्धकोष्ठता कमी पाणी पिणे, पुरेशी झोप न घेणे इत्यादींमुळे होते.
बद्धकोष्ठता का उद्भवते?
जेव्हा दिवसा मल वेळेवर बाहेर येत नाही. तेव्हा अनेकदा मल पास करण्यास त्रास होतो. याला बद्धकोष्ठता म्हणतात. बद्धकोष्ठतेत मल कोरडा होतो त्यामुळे सकाळी फ्रेश होण्यात अडचण येते. कारण पोट साफ होत नाही. त्यामुळे दिवसभर पोट जड जाणवू शकते. जेवणही व्यवस्थित जात नाही. बहुतेक लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासले आहे.
जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या जेवणातील 'हे' 2 पदार्थ; समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट
कारणं
पोट साफ न होण्याचे कारण म्हणजे कमी पाणी पिणे. डॉ. मनजीता नाथ दास सांगतात की, जेव्हा लोक कमी पाणी पितात, तेव्हा मल कोरडा होऊ लागतो, त्यामुळे ते पास करणे कठीण होते. पाणी कमी प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि मल पास होत नाही.
- जे लोक जेवणात हिरव्या भाज्या कमी खातात त्यांनाही पोट साफ न होण्याची समस्या असते. हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये फायबर असते. अन्नामध्ये फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. फायबरचे दोन प्रकार आहेत, सॉल्युबल आणि इनसॉल्युबल. हे दोन्ही फायबर पोट साफ करण्यात मोठी भूमिका बजावतात. फायबरच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
- जड अन्नाचे सेवन हे देखील पोट साफ न होण्याचे कारण आहे. बरेच लोक भरपूर मांसाहार करतात, त्यामुळे पोट साफ व्हायला त्रास होतो. अर्धवट शिजलेलं, कच्चे अन्न पचवण्यासाठी शरीरातील एन्झाईम्स अजिबात काम करू शकत नाहीत. त्यामुळे अन्न पचवता येत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही अशा प्राण्याचे मांस खाल्ले ज्यासाठी तुमच्या शरीरातील एन्झाईम्स पचनासाठी नीट काम करत नाहीत, तर पोट साफ न होण्याची समस्या उद्भवते.
स्मृती इराणींनी केलं जबरदस्त वेट लॉस; ट्रासफॉर्मेशनचा नवा फोटो पाहून लोक म्हणाले....
- अवेळी खाणे, कधीही खाल्ल्यानं बद्धकोष्ठता उद्भवते. जे लोक अवेळी अन्न खातात, त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. त्यामागचे कारण त्यांनी सांगितले की, अन्न पचायला वेळ लागतो. वेळ नसेल तर पचणार नाही. यामुळे, मल घट्ट होतो आणि आतड्यांसंबंधी हालचाल होण्यास त्रास होतो.
- तणावामुळे झोप कमी होते. झोपेचा थेट पचनाशी संबंध असतो. दुसरे म्हणजे तणावाखाली राहिल्याने लोकांची जीवनशैली खराब होते. एकतर ते जास्त खातात किंवा कमी खातात. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि मल जाण्यास त्रास होतो. तणावामुळे आतड्यात संसर्ग होतो, ज्यामुळे ताजेतवाने होणे कठीण होते.
बचावाचे उपाय
जे लोक लॅक्टोज इंटोलरेंस आहेत त्यांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये. ज्यांना या उत्पादनांची ऍलर्जी आहे ते त्यांचे पर्याय निवडू शकतात.
पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती योग्य प्रमाणात पाणी पिते तेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. पोट साफ करताना कमी पाणी योग्य प्रमाणात असल्यास मल सुकणार नाही आणि पोट सहज साफ होईल. एका व्यक्तीने दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
योग्य प्रकारे शिजवलेले अन्न पचनक्रिया बिघडवत नाही. अन्न पचवणारे एन्झाईम्स व्यवस्थित काम करतात. त्यामुळे मल मऊ होऊन ते जाण्यास अडचण येत नाही.
जे लोक पुरेशी झोप घेतात त्यांच्या पचनाच्या समस्या कमी होतात. पोट सुरळीत राहिल्यास इतर समस्या नसतात. अशा परिस्थितीत पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे जेणेकरून बद्धकोष्ठतेची समस्या टाळता येईल.
ना डाळ भिजवायची कटकट ना दळायची झंझट; फक्त अर्ध्या तासात बनवा गरमागरम कुरकुरीत ब्रेड मेदूवडा
पित्ताशयातील खड्यांवर शस्त्रक्रियेने उपचार केले जातात. परंतु या समस्येची लक्षणे दिसू लागल्यावर सुरुवातीला उपचार करा, म्हणजे शस्त्रक्रिया करावी लागणार नाही. पण हा पित्ताशयाचा खडा वाढला असेल तर तो शस्त्रक्रियेने दुरुस्त केला जातो.
आजच्या काळात पोट साफ न होण्यामागे बद्धकोष्ठता हे प्रमुख कारण आहे. बद्धकोष्ठता कमी पाणी पिणे किंवा फायबरयुक्त अन्न कमी खाल्ल्याने होतो. पोट साफ न होण्यामागे बद्धकोष्ठतेशिवाय अनेक कारणे आहेत. ज्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.