Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफ होत नाही-त्रास होतो? २ मिनिटांचे २ व्यायाम, पोट होईल साफ होईल-पचनही सुधारेल

पोट साफ होत नाही-त्रास होतो? २ मिनिटांचे २ व्यायाम, पोट होईल साफ होईल-पचनही सुधारेल

Constipation Solution At Home (Pot saf honyasathi upay sanga) : व्यायाम केल्याने मोठ्या आतड्यांत अन्न पचनाची क्रिया वेगाने होण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:06 PM2024-01-04T14:06:28+5:302024-01-04T14:16:15+5:30

Constipation Solution At Home (Pot saf honyasathi upay sanga) : व्यायाम केल्याने मोठ्या आतड्यांत अन्न पचनाची क्रिया वेगाने होण्यास मदत होते.

Constipation Solution At Home : 2 Exercise For Constipation Home Remedies for Constipation | पोट साफ होत नाही-त्रास होतो? २ मिनिटांचे २ व्यायाम, पोट होईल साफ होईल-पचनही सुधारेल

पोट साफ होत नाही-त्रास होतो? २ मिनिटांचे २ व्यायाम, पोट होईल साफ होईल-पचनही सुधारेल

टॉयलेट सीटमध्ये तासनतास बसून राहावे लागते, बराचवेळ पोट साफ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. याचं कारण गॅस, बद्धकोष्टता असू शकतं.  (Pot saf honyasathi kay karave) लोकांच्या जेवणाच्या वेळा चुकतात, पाणी कमी पिणं, जेवणात फायबर्सचा अभावा या सगळ्यामुळे पोट साफ होण्यात अडथळे  येतात. (Natural Home Remedies For Constipation) व्यायाम केल्याने फक्त पोट कमी होत नाही तर मसल्स टोन होण्यात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यातही मदत होते.  गॅस होणं कमीत कमी फिजिकल एक्टिव्हीजमुळे उद्भवते. (Fast Constipation Relief Tips)

योगा एक्सपर्ट जुही कपूर सांगतात की २ फक्त २ व्यायाम करून तुम्ही पोटाचे आरोग्य चांगले ठेवू शकता. ज्यामुळे  पोटाच्या आजूबाजूला जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया चांगली राहते आणि गॅस-एसिडीटीचा त्रासही उद्भवत नाही. व्यायाम केल्याने मोठ्या आतड्यांत अन्न पचनाची क्रिया वेगाने होण्यास मदत होते. (Constipation Solution At Home)

एरोबिक एक्सरसाईज ब्रिथिंग रेट वाढवण्यास मदत करते. मल वेगाने बाहेर पडण्यासही मदत होते. मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या,  दीनचर्येत व्यायामाचा समावेश करा. कॉफीचे सेवन करा. प्रो बायोटिक्स पदार्थांचा आहारात समावेश करा. डेअरी उत्पादनांचे अतिसेवन करू नका. फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 

१) मलासन ट्विस्ट

मलासन केल्याने पोटाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. मलासनात बसल्याने डायजेशन चांगले राहते. ट्विटस्टिंग पोजमुळे पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय गॅसची समस्या टाळण्यासही मदत होते. गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. पोट आणि नसांचे मसल्स स्ट्रेच होण्यास मदत होते, शरीराच्या वेगवेगळ्या  भागात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. पाय, हिप्स, मांड्या टोन राहण्यास मदत होते.  श्वासांशी संबंधित समस्याही टाळता येतात. 

२) क्रो वॉक

क्रो वॉक करण्यासाठी मलासनात बसून मागे-पुढे या. यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत होते आणि पोटाच्या खालच्या भागात ब्लड फ्लो वाढून गॅसची समस्या टाळता येते. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी गुडघे वाकवून घ्या. पायांवर गुडघे ठेवून मलासनात बसा. या स्थिती थोडावेळ वर राहा. नंतर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. १० ते २० वेळा हा व्यायाम करा. 

क्रो वॉक करण्याचे फायदे

क्रो वॉक केल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी होते, सूज कमी होते, पोटाच्या खालच्या भागात ब्लड फ्लो व्यवस्थित होतो. याशिवाय मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते.  ओटी पोटाची सुटलेली चरबीही कमी होण्यास मदत होते. 

Web Title: Constipation Solution At Home : 2 Exercise For Constipation Home Remedies for Constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.