Join us   

Constipation Solution at Home :  गॅस, अपचनामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं? ५ पदार्थ रोज खा, पोटाचे विकार कामयचे राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 12:59 PM

Constipation Solution at Home : बद्धकोष्ठतेची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये कोरडे, थंड, मसालेदार, तळलेले आणि फास्ट फूडचे अतिसेवन, पुरेसे पाणी न पिणे, अन्नामध्ये कमी फायबर, खराब चयापचय, रात्री उशिरा खाणे, बैठी जीवनशैली यासारख्या घटकांचा समावेश आहे.

बद्धकोष्ठता (Constipation) ही पचनाची सामान्य समस्या आहे. बद्धकोष्ठता ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये पोट साफ व्हायला त्रास होतो. मल कडक झाल्यामुळे  असा त्रास होतो. (How to treat constipation bloating) ते पूर्णपणे तुमच्या आहारावर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. बद्धकोष्ठतेची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये कोरडे, थंड, मसालेदार, तळलेले आणि फास्ट फूडचे अतिसेवन, पुरेसे पाणी न पिणे, अन्नामध्ये कमी फायबर, खराब चयापचय, रात्री उशिरा खाणे, बैठी जीवनशैली यासारख्या घटकांचा समावेश आहे. (How to get rid of gas pain fast)

प्रदीर्घ बद्धकोष्ठतेमुळे पचनक्रिया बिघडते. याशिवाय डोकेदुखी, गॅस, भूक न लागणे, अशक्तपणा आणि मळमळ होणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, काळे डाग येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, बद्धकोष्ठता फक्त काही दिवसांसाठी असते, परंतु त्याचा दिवसभरातील तुमच्या क्रियांवर परिणाम होण्याची शक्यता असते. (Constipation Bloating) अशा स्थितीत लोक ताबडतोब औषधे घेतात. काहीवेळाअधिक औषधे देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत घरगुती उपायांचा जास्तीत जास्त वापर करावा. डॉ.  दिक्षा भावसार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Ayurveda expert shared natural laxatives for constipation acidity and other digestive issue)

काळे मनुके

काळ्या मनुकामध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे मल सैल होतो आणि आतड्याची हालचाल सुधारते. यामुळे, मल पास करताना जास्त जोर लावावा लागत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही. आयुर्वेद डॉक्टर सुचवतात की मनुका हे कोरडे अन्न असल्यामुळे ते तुमचा वात दोष वाढवू शकतात आणि जठरासंबंधी समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे  भिजवलेल मनुके खाणे चांगले, त्यामुळे पचनाचा त्रास होत नाही.

जेवल्यानंतर रोज ‘किती’ वेळ चाललं तर आजार कायमचे दूर राहतील; तब्येतही राहील फिट

मेथीच्या बीया

मेथीचे सेवन केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. परंतु पित्त दोष असलेल्यांनी त्याचे सेवन टाळावे. डॉक्टर दीक्षा सुचवतात की 1 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी सर्वात आधी खाऊ शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही या बियांची पावडर देखील बनवू शकता आणि झोपताना 1 चमचे कोमट पाण्यासोबत सेवन करणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आवळा

आवळा एक अद्भुत पदार्थ आहे.  आवळा केस गळणे, पांढरे केस, वजन कमी होणे आणि इतर आरोग्य समस्यांमध्ये फायदेशीर ठरतो. नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यास तब्येत चांगली राहते. 

पावसाळ्यात सर्दी -खोकला, व्हायरल इन्फेक्शनला लांब ठेवतील ५ पदार्थ; रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल

गाईचे तूप

A2 गायीचे तूप तुमचे चयापचय सुधारते. हे तुम्हाला व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारखी चरबी-विद्रव्य जीवनसत्त्वे शोषण्यासाठी आवश्यक आहे. डॉक्टर दीक्षा सांगतात की म्हशीचे तूप जड असल्याने आणि सर्वांना सूट होत नाही.  ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी म्हशीचे तूप चांगले आहे. जास्तीत जास्त फायद्यांसाठी नेहमी A2 गाईचे दूध आणि तूप यांना प्राधान्य द्या. 1 चमचे गाईचे तूप एक ग्लास कोमट गाईच्या दुधासह दीर्घकालीन बद्धकोष्ठता असलेल्या लोकांसाठी चांगले काम करते.

गाईचे दूध

गाईचे दूध हे लहानांपासून मोठ्यांसाठी फायदेशीर आहे.  पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी दुधाचे सेवन खूप फायदेशीर असल्याचे आयुर्वेद डॉक्टर सांगतात. झोपेच्या वेळी एक ग्लास कोमट दूध प्यायल्यास त्याचे भरपूर फायदे मिळतात. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य