Join us   

पोटात कळ येते पण पोट साफच होत नाही? या वेळेत जिऱ्याचं पाणी प्या, पोट होईल साफ रोज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:51 PM

Constipation Solution :

सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही टॉयलेटमध्ये जाता तेव्हा रोज पोट साफ होतच असं नाही. आदल्या दिवशी खाण्यात वेगळे पदार्थ किंवा बाहेरचे अन्न असेल तर पोट साफ होत नाही असा त्रास बऱ्याच जणांना होतो. ही समस्या टाळण्यासाठी जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.  जीरं हा भारतीय स्वयंपाकघरातील महत्वपूर्ण मसाला आहे. स्वंयपाकाची चव वाढवण्यासाठी या मसाल्याचे सेवन केले जाते (How To Get Rid Of Constipation) नियमित जिऱ्याचे सेवन केल्यानं पोटाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. (Home remedies Prepare Cumin Water At Home For Stomach Clear)

जिऱ्याचं पाणी कसं बनवायचं?

जिऱ्याचं पाणी बनवणं खूपच सोपं आहे. एक चमचा जीरं रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा.  सकाळी उठून  हे पाणी उकळवून याचे सेवन करा. हलकं थंड झाल्यानंतरच हे पाणी प्या. पाणी नियमित प्यायल्यानं  पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होते. 

पचनक्रिया चांगली राहते

जिऱ्यात अनेक प्रकारची पोषक तत्व असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याच्या सेवनानं  खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. पोटाशी संबंधित समस्या  जसं की गॅस, एसिडीटी, अपचनापासून आराम मिळतो.  एसिडीटीमुळे पोटात जळजळ होते ज्यामुळे पोट साफ न होण्याची समस्या उद्भवते जिऱ्यातील पोषक तत्व पोटातील आम्लता संतुलित करतात ज्यामुळे पोटाला आराम मिळतो. तुम्हाला एसिडीटीची समस्या उद्भवत असेल तर जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरेल.

पोटातील गॅस आणि ब्लॉटिंगपासून आराम मिळतो

पोटातील गॅस आणि ब्लॉटींगच्या त्रासापासून बचावासाठी तसंच पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं. यात असे काही पोषक तत्व असतात ज्यामुळे गॅस, ब्लॉटींगपासून सुटका मिळते.  जिऱ्याचं पाणी पिणं हा सरळ आणि प्रभावी उपाय आहे. ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. नियमित सेवन केल्यास पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि आरोग्यही चांगले राहते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सलाइफस्टाइल