Join us   

जेवल्यानंतर पोट डब्ब होतं-गॅसेस होतात? ‘हा’ पदार्थ खा, गॅसेसचा त्रास आणि कुचंबणा दोन्ही होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 2:42 PM

Consume A Spoonful Of Saunf After A Meal To Avoid Gas : जेवल्यानंतर बडिशोप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.

जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस होतो असे त्रास अनेकांना वाटतं. सतत गॅस, ब्लॉटिंगच्या गोळ्या घेणं तुमच्यासाठी योग्य नाही.  बडिशेप ही एक प्रकारची जडीबूटी आहे. स्वाद आणि फ्लेवरर्स बडिशेपेचा वापर केला जातो. आयुर्वेदातील  औषधी गुण आणि शारीरिक समस्यांवर उपाय करण्यासाठी बडिशेपेचा वापर केला जातो. जेवणाच्या नंतर बडिशेपेचा आहारात समावेश केल्यास पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.(Consume A Spoonful Of Saunf After A Meal To Avoid Gas)

जेवल्यानंतर बडिशेप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते.आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ आदिती शर्मा यांनी एका हिंदी वेबसाईडशी बोलताना बडिशोप खाण्याच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे.  याशिवाय त्यांनी याचे आरोग्यदायी फायदेही सांगितले आहेत.

 जेवल्यानंतर बडिशेपेचे सेवन का केले जाते

जगभरात खासकरून भारतात जेवल्यानंतर बडिशेप खाण्याची प्रथा आहे. ही खूप जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे. बडिशेपेचं सेवन जेवणानंतर का आवश्यक आहे ते समजून घ्यायला हवं. 

हवं ते दिलं नाही की मुलं घर डोक्यावर घेतात? ५ गोष्टी करा, आपोआप शिस्त लागेल-शांत राहतील मुलं

पचनक्रिया चांगली राहते

जेवल्यानंतर बडिशोप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय गॅस रिलीज होतो. बडिशोपेत एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे इन्फ्लेमेशन कमी होते. गॅसचे कारण  ठरत असलेल्या बॅक्टेरियाजची ग्रोथ कमी होते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार बडिशेप इरेटेबल बॉवेल सिंड्रोमचे लक्षण नियंत्रित करण्यात मदत करते. 

जेवल्यानंतर ब्लोटींग

असे बरेच लोक आहेत ज्यांना ब्लॉटींगचा त्रास होतो. जेव्हा पोट अधिकच फुलते तेव्हा त्यांना ही समस्या उद्भवते. अशा स्थितीत खाल्ल्यानंतर बडिशेप खाल्ल्याने डायजेस्टिव्ह टॅक्टच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि त्या रिलॅक्स राहतात. बडिशेपेत फ्री बायोटीक फायबर्स असतात. ज्यामुळे चांगल्या बॅक्टेरियाची ग्रोथ चांगली राहते. यामुळे गट फ्लोरा आणि गट मायक्रोबायोाम निरोगी राहतात. याशिवाय पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. 

लहानपणापासून प्रचंड हूशार असतात 'या' ४ सवयी असलेली मुलं; टेंशन घेणं सोडा-स्मार्ट होतील मुलं

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

जेवल्यानंतर ब्लड शुगर स्पाईक होणं खूपच सामान्य आहे. अशा स्थितीत तुम्ही बडिशेप खाल्ल्यास फायबर्स शरीराला मिळतील शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. बडिशोप खाल्ल्याने जेवल्यानंतर समाधान मिळते, सतत खाण्याची इच्छा होत नाही आणि तुम्ही कमीत कमी कॅलरीज घेता.

श्वासांचा दुर्गंध येत नाही

जेवल्यानंतर अनेकांच्या तोंडातून दुर्गंध येतो.  तोंडातून दुर्गंध येत असेल तर तुम्ही बडिशेप खाऊ शकतात. ज्यामुळे श्वासांचा दुर्गंध येत नाही आणि फ्रेश वाटतं. जेवल्यानंतर १ चमचा बडीशोप चावून खा, शुगर कोटेड बडिशोप खाऊ नका. कारण यात रिफाइंड शुगर असते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स