Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चमचाभर एरंडेल तेल पिण्याचे ५ फायदे; कडू लागू नये म्हणून ‘असं’ प्या, पोटही होईल साफ!

चमचाभर एरंडेल तेल पिण्याचे ५ फायदे; कडू लागू नये म्हणून ‘असं’ प्या, पोटही होईल साफ!

Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits : एरंडेल तेल जरी चवीला वाईट असले तरी शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे. पाहा कसे प्यावे व कधी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2025 18:31 IST2025-03-20T10:33:09+5:302025-03-20T18:31:16+5:30

Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits : एरंडेल तेल जरी चवीला वाईट असले तरी शरीरासाठी प्रचंड फायदेशीर आहे. पाहा कसे प्यावे व कधी.

Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits. | चमचाभर एरंडेल तेल पिण्याचे ५ फायदे; कडू लागू नये म्हणून ‘असं’ प्या, पोटही होईल साफ!

चमचाभर एरंडेल तेल पिण्याचे ५ फायदे; कडू लागू नये म्हणून ‘असं’ प्या, पोटही होईल साफ!

काही वस्तू या आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. त्यांचे एक नाही दोन नाही अनेक उपयोग असतात. अशीच एक वस्तू आपल्या घरामध्ये पडून असते. (Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits.)ती वस्तू म्हणजे एरंडेल तेल. लहानपणी आई महिन्यातून एकदा तरी एरंडेल तेल प्यायला द्यायची. पण तेव्हा त्याच्या चवीमुळे आपण ते प्यायला नाही म्हणायचो. एरंडेल तेल प्यायल्यावर ते सारखे घशाशी येत राहते. त्यामुळे ते पिणे अनेक जण टाळतात. (Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits.)पण ते शरीरासाठी भरपूर गुणकारी असते. 

ते पिताना जर तुम्हालाही त्याची चव नको वाटत असेल, तर आपण पोळ्या तयार करतो तेव्हा त्यामध्ये अगदी चमचाभर एरंडेल तेल घालावे. (Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits.)त्याचा फायदा होतोच आणि चवही अजिबात जाणवत नाही. तसेच चहाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घ्यायचे आणि नंतर लवंग चघळायची.  लवंग तेलाचा वास तसेच चवही तोंडातून गायब करून टाकते.   

एरंडेल तेलामध्ये रिसिनोलिक नावाचे एक फॅटी अॅसिड असते. जे शरीरासाठी फार गुणकारी ठरते. तसेच एरंडेल तेलामध्ये इतर फॅटी अॅसिडही असतात. भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व 'ई' असते.

एरंडेल तेलाचे उपयोग-

१. केसांच्या पोषणासाठी हे तेल फार औषधी आहे. चमचाभर एरंडेल तेल साध्या खोबरेल तेलामध्ये मिसळा आणि केसांना लावा. असे केल्याने केस काळेभोर होतात. तसेच केस गळणेही थांबते. केसांना गरजेची असलेली सत्वे या तेलामधून मिळतात. केसांना टोकंही फुटत नाहीत. केस छान लांब व सरळ राहतात. टाळूसाठी एरंडेल चांगले असते. 

२. सकाळी रिकाम्या पोटी चमचाभर एरंडेल घ्यावे. मात्र सुट्टीच्या दिवशीच घ्या, कारण हे तेल प्यायल्यानंतर पोट साफ होण्याची प्रक्रिया सुरू होते. पोटात अडकलेली सगळीच घाण मलावाटे शरीराबाहेर टाकली जाते. पोटाच्या समस्यांवर एरंडेल तेल अत्यंत फायदेशीर आहे. 

३.अनेकांना वाताचा त्रास असतो. शरीरामधील वाढलेला वात कमी करण्यासाठी एरंडेल तेल उपयुक्त ठरते. पायाला हे तेल लावायचे. तसेच एरंडेल तेलाने मसाज केल्याचाही फायदा होतो. आखडलेले अवयव मोकळे होतात.   

४. त्वचेसाठीही एरंडेल तेल जादूप्रमाणे काम करते. चेहर्‍यावरील डाग असोत किंवा तारुण्यपिटीका. सगळेच त्रास कमी होतात.  

Web Title: Consume castor oil this way, it won't taste bad and you will get many benefits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.