जीवन जगण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. कोणी व्यवसाय करून स्वतःच आणि आपल्या प्रियजनांचे पोट भरतो, तर कोणी नोकरी करून कमाई करतो. काहींकडे एकट्याच्या खांद्यावर घर चालवण्याची जबाबदारी असते. त्यासाठी अनेकजण दिवसासह रात्रपाळीत देखील काम करतात. बहुतांश लोकं घरातील सगळे रात्री झोपलेले असताना त्याच वेळेस उठून आपलं काम पूर्ण करतात. मात्र, असा नित्यक्रम सातत्याने पाळल्याने शरीर हे आजार किंवा आरोग्याच्या समस्यांचे माहेरघर बनू लागते. आपणही रात्रपाळीत काम करतात का ? तसं असेल तर या कारणामुळे कोणकोणते आजार व आरोग्याच्या समस्या शरीरात उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.
मेटाबॉलिक सिंड्रोम
नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका असतो. या स्थितीत, उच्च रक्तदाब , उच्च साखर, वजन वाढणे आणि आणि कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडणे यासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना जागं राहावं लागलं तरी ते त्यांच्या आहाराची काळजी घेऊनही निरोगी राहू शकतात. त्यासाठी रात्री गरम पाणी प्यावे आणि शक्य तितकं हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करावा.
व्हिटॅमिन डी ची कमतरता
रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना ऊन मिळत नाही. ऊन हे व्हिटॅमिन डी चा सर्वाच उत्तम स्त्रोत मानला जातो. पुरेसं ऊन न मिळाल्याने शरीरात इतर त्रासही होऊ शकतात. रात्रभर काम करणाऱ्यांनी, काही वेळ तरी उन्हात घालवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे.
हृदयाच्या निगडीत समस्या
जो व्यक्ती रात्रपाळीचे वर्क कल्चर फॉलो करतो. त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. रात्री काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये दर पाच वर्षांनी हार्ट ॲटॅकचा धोका काही टक्क्यांनी वाढतो, अशी माहिती एका अभ्यासात देण्यात आली आहे. खरंतर, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि अशा परिस्थितीत हृदयरोग होऊ शकतो.
सामाजिक जीवनावर परिणाम
रात्री उशिरा काम केल्यामुळे लोक दिवसा झोपतात. ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय, या गोष्टीचा त्यांच्या सामाजिक जीवनावरही परिणाम होतो. त्यांचे मित्र, परिचित यांच्यापासून ते लांब होऊ लागतात. आणि ही मुख्य गोष्ट त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करण्याचे कारण बनते.