संध्याकाळच्यावेळी जरा खिडकी किंवा दरवाजा उघडा राहीला की भरपूर डास घरात शिरतात. यामुळे झोप तर खराब होतेच याशिवाय गंभीर आजारांचाही धोका वाढतो. रात्री झोपेत असताना डास चावायला लागले की झोप मोड होते आणि अंगावर पुरळ, खाजही येते. (Controlling Mosquitoes at Home) डास चावू नयेत म्हणून लावलेल्या लोशनचा आणि कॉईलचाही उपयोग होत नाही. अशावेळी डासांना दूर पळवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to get rid of mosquitoes at home)
कापूर
रात्री घरात खूप डास शिरले असतील तर कॉईल किंवा दुसऱ्या केमिकल्सयुक्त वस्तूंचा वापर टाळा. कापराचा वापर करून तुम्ही १५ ते २० मिनिटात डासांना दूर पळवू शकता. (The Ultimate Guide to Getting Rid of Mosquitoes at Home)
कडुलिंबाचं तेल
कडुलिंबाच्या तेलाचा वापर डासांना दूर पळवण्यासाठी केला जातो. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. या उपायानं ८ तास डास तुमच्याआजूबाजूला येणार नाहीत.
निलगिरीचं तेल
दिवसाही तुम्हाला डास चावत असतील तर तुम्ही निलगिरीचं तेल वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी निलगिरी तेलात लिंबू समान प्रमाणात मिसळा. हे तेल अंगाला लावा. याच्या उग्र वासामुळे डास आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.
लसूण
घरात डास येऊ नयेत यासाठी लसूण वापरा. लसणाच्या वासाने डास पळून जातात. यासाठी लसूण बारीक करून पाण्यात टाकल्यानंतर उकळवा. आता हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. त्यामुळे बाहेरून डास घरात येणार नाहीत.
लेव्हेंडर
डासांना दूर करण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय म्हणजे लॅव्हेंडर. त्याचा सुगंध खूप तीव्र असतो, त्यामुळे डास आजूबाजूला येत नाहीत आणि तुम्हाला चावणार नाहीत. तुम्ही घरात लॅव्हेंडर रूम फ्रेशनरही लावू शकता.
घरगुती उपाय
सगळ्यात आधी एक मातीची पणती घ्या. त्यात नारळाचं तेल. कडुलिंबाचं तेल एक चमचा घाला. त्यात २ मोठ्या कापराच्या वड्या घाला हे ते एकत्र करून त्याचा दिवा लावा. आजूबाजूला काहीही नसेल अशा ठिकाणी दिवा ठेवा. हा दिवा लावल्यानंतर हळूहळू धूर घरात पसरेल आणि डास घराबाहेर पडण्यास मदत होईल.