दिवसभर घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी आपण पाण्याची बाटली कायम आपल्यासोबतच ठेवतो. आता ही पाण्याची बाटली नेमकी कोणत्या मटेरियलपासून तयार केलेली असावी असा प्रश्न अनेकांना पडतोच. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार तांबे, स्टील, काच किंवा प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून तयार झालेल्या पाण्याच्या (Copper Vs Steel Bottles Which Is Healthier For Drinking Water) बाटल्यांचा वापर करतात. परंतु प्रश्न जेव्हा आरोग्याचा येतो तेव्हा नेमकं यातील कोणत्या मटेरियल पासून बनलेल्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करावा हे आपल्याला समजत नाही(Copper Vs Steel Bottles What is the Safest Water Bottle Material).
परंतु गेल्या काही वर्षात, तांबे आणि स्टीलपासून तयार केल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्या वापरण्याचा ट्रेंड फारच वाढला आहे. आजकाल प्रत्येकजणांच्या बॅगेत स्टील किंवा तांब्यापासून तयार केलेल्या पाण्याच्या बाटल्या दिसतात. परंतु यातही नक्की तांबे किंवा स्टील या दोघांपैकी कोणत्या धातूपासून तयार केलेल्या बाटलीचा वापर करावा ते पाहूयात.
पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी कि स्टीलची ?
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात नैसर्गिकरित्या अँटी-इन्फेक्शन (जिवाणूविरोधी) गुणधर्म तयार होतात. तांब्यामध्ये अद्वितीय गुणधर्म असतात, जे जीवाणू मारण्यास आणि शरीराला हानिकारक घटकांपासून वाचवण्यास मदत करतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असते, जे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात. याचबरोबर, थायरॉईड आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकते. तांब्याच्या बाटलीत पाणी ६ ते ८ तास ठेवले जाते, त्यानंतर हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु, तांब्याची बाटली वेळोवेळी स्वच्छ करणे खूप गरजेचे असते. ती लिंबू आणि मीठ किंवा व्हिनेगरने धुवावी, जेणेकरून त्यात घाण जमा होणार नाही आणि ऑक्सिडेशनची प्रक्रियाही मंद होईल. ती पूर्णपणे सुकल्यानंतरच वापरावी.
ब्रा फॅट्स दिसल्याने शरीर बेढब दिसते? ४ सोपे व्यायाम करतात ब्रा फॅट्स कमी...
स्टीलच्या बाटलीतून पाणी पिणे देखील एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात रासायनिक घटक नसतात आणि ते पाणी दूषित करत नाहीत किंवा त्याची चव बदलत नाहीत. स्टेनलेस स्टीलला गंज लागत नाही आणि ते दीर्घकाळ टिकणारा, मजबूत आणि सुरक्षित असा धातू असतो. त्यापासून बनवलेल्या बाटल्या पर्यावरणासाठीही चांगल्या असतात, कारण स्टेनलेस स्टील १००% पुनर्वापर करण्यायोग्य आहे.
याशिवाय, स्टीलच्या बाटल्या खूप सहज स्वच्छ करता येतात. या बाटल्यांमध्ये इन्सुलेशन असते, ज्यामुळे पाणी जास्त काळ थंड किंवा गरम राहते. मात्र, काही स्टीलच्या बाटल्यांमध्ये निकेल असते, ज्यामुळे काही लोकांना ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे स्टीलची बाटली खरेदी करताना ती चांगल्या दर्जाची आहे याची खात्री करणे महत्त्वाचे असते.
फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...
तांबे की स्टील, नेमका कोणत्या बाटलीचा वापर करावा ?
जर तुम्ही आयुर्वेदिक फायदे आणि सूक्ष्मजंतूविरोधी गुणधर्म असणारी बाटली वापरु इच्छित असाल, तर तांब्याची बाटली तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. पण जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी आणि पर्यावरणपूरक बाटली हवी असेल, तर स्टीलची बाटली एक उत्तम पर्याय आहे.