देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये लसीकरणाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 76 कोटी 57 लाखांहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 64 लाखांहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण संक्रमणाबद्दल बोललो तर, गेल्या 24 तासांमध्ये, कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे गेल्या अनेक दिवसांपासून चढ -उतार करत आहेत. याच कारणामुळे देशात साथीच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. हे पाहता सर्व लोकांना लस लवकरात लवकर घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणात सहभागी होण्यासाठी फक्त महिलांच्या लसीकरणाचे आयोजन केलं जात आहे. बरेच लोक आहेत जे अजूनही लस घेण्यास घाबरतात. लस घेतल्यानंतर ताप किंवा इतर त्रास जाणवला तर घरातली काम एकटीनं कशी करणार अशी भीती अनेकींच्या मनात आहे. आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तज्ज्ञांनी लस घेतल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयातील डॉ. वेद चतुर्वेदी म्हणतात, ''देशाला कोरोनापासून वाचवायचे आहे. कुटुंबाला आणि समाजालाही वाचवायचे आहे. ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर स्वतः लस घेणे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना जागरूक आणि प्रेरित करणे हे आपले कर्तव्य आहे. ;;
पूर्ण लसीकरणाआधी प्रवास करणं योग्य की अयोग्य?
आपण कोरोनाला दोन प्रकारे पराभूत करू शकतो आणि कोविड नियमांचे पालन आणि लसीकरणानं ही लढाई जिंकता येऊ शकते. 100% लसीकरण करण्यास वेळ लागेल. पण पुन्हा जनजीवन रूळावर आणणं फार महत्वाचं आहे. म्हणून जर तुम्ही अद्याप लस घेतली नसले तर लवकरात लवकर घ्या. जर तुम्हाला कुठे लांबचा प्रवास करावा लागला तर लसीकरण पूर्ण झालं असल्यास प्रवासादरम्यान अडचणी कमी येतील.
रोजच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानं असा होतो फायदा; ५ आजारांपासून कायमचे लांब राहाल
लसीकरणानंतर सूज आल्यास काय करायचं?
डॉ वेद चतुर्वेदी म्हणतात, ''लसीचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत. परंतु जर अशी समस्या असेल तर आपण डॉक्टरांना दाखवू शकता. हे इतर काही एलर्जीमुळे असू शकते. सौम्य ताप, शरीर दुखणे किंवा लसीच्या ठिकाणी दुखणे, हे परिणाम केवळ 24-48 तास टिकतात.''
दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात
लसीमुळे मजबूत संरक्षण मिळतं पण ही सुरक्षा तयार होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पूर्ण प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी लोकांनी आवश्यक तेवढ्या मात्रा घेणं आवश्यक आहे. दोन मात्रेची लस असेल तर एका मात्रेमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळेल आणि दुसऱ्या मात्रेनंतर ते वाढेल. सुरक्षेची कमाल पातळी गाठण्यासाठी दुसरी मात्रा घेतल्यानंतर काही आठवडे जावे लागतात.