Join us   

कोविड किंवा सर्दी-कफ होण्याची भिती वाटते? झोपताना न चुकता कोमट पाणी प्या अन् तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 11:59 AM

CoronaVirus Prevention : थंड पाणी पिण्याऐवजी प्रत्येकाने कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात.

थंडीच्या दिवसात योग्य खाण्यापिण्याची काळजी घेतली तर आपण पूर्णपणे निरोगी राहू शकता.  साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी विविध उपायांचा अवलंब केला जातो. अशा स्थितीत गरम पाणी पिण्याचे काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेतले पाहिजे. जर आपण पाणी  कोमट प्यायले तर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात.

अशा वेळी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. चला तर मग जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.  (Viral infection to protect yourself drink hot water before sleeping)

शरीर हायड्रेट राहतं

थंड पाणी पिण्याऐवजी प्रत्येकाने कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि रक्ताभिसरण सुधारते. हे आपल्या पेशींना पोषण पुरवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

मूड चांगला राहतो

तुमचा मूड चांगला नसेल तर गरम पाण्याचा खूप फायदा होतो. असे मानले जाते की याने तुमचा मूड  सकारात्मक,  चांगला राहतो. पाण्याच्या कमतरतेमुळे तुमचा मूड नकारात्मक होतो. म्हणूनच आपण अधिकाधिक प्यावे. हे मूड शांत करण्यास आणि सकारात्मक बनविण्यात मदत करते.

पचनक्रियेसाठी चांगले

गरम पाण्याने चयापचय क्रियाही सुधारते. गरम पाणी तुमचे चयापचय गतिमान करते. वजन कमी करणे देखील सुधारते. याशिवाय गरम पाणी पिण्याने पचनक्रिया बळकट होण्यातही महत्त्वाचं योगदान असतं. पचनक्रियेसोबतच गरम पाणी पिणे रक्तप्रवाह वाढवण्यासाठी, स्नायूंना आराम देण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्यास  रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत मिळते.  नाक आणि घशाला त्रास होत असेल तर अशावेळेस कोमट पाणी प्यावे. याने नक्कीच फायदा होतो. यामुळे घसा स्वच्छ होण्यास मदत होते.  गरम पाण्याच्या सेवनानं बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.

शरीरातील सर्व अशुद्ध द्रव्ये बाहेर फेकली जातात. ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या असते अशा व्यक्तींनी एक ग्लास गरम पाण्यात काळी मिरी, मीठ, मध आणि लिंबूचा रस टाकावा. हे पाणी प्यायल्याने भूक वाढते. त्यामुळे ज्यांना वजन वाढवायचे असेल अशा व्यक्तींनी हे पाणी जरूर प्यावे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकोरोना वायरस बातम्याओमायक्रॉन