Join us   

Cough Causes : औषध, घरगुती उपाय केले तरी खोकला जातच नाही? या ५ कारणांमुळे वारंवार उद्भवतो खोकला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 7:37 PM

Cough Causes : खोकला हा नेहमीच कोणत्याही गंभीर आजाराशी संबंधित नसतो, परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

गेल्या  दीड, दोन वर्षांपासून सर्दी, खोकला म्हटलं की सगळ्यांच्याच मनात धडकी भरते. कोरोना संक्रमण झालं असेल का? अशी भीती वाटते.  एखादी व्यक्ती शिंकली तर आपला मास्क व्यवस्थित लावलाय ना याची खात्री करण्यासाठी लोक मास्ककडे लक्ष देतात. खोकला येण्याची अनेक कारणं असू शकतात. बरेच लोक असे  आहेत  ज्यांना एकदा खोकला झाला की कित्येक आठवडे जात नाही. खोकला हे COVID-19 चे सर्वात सामान्य लक्षण आहे, परंतु ते एकमेव लक्षण नाही. खोकला हा नेहमीच कोणत्याही गंभीर आजाराशी संबंधित नसतो, परंतु तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  खोकला जास्त असेल तर आधी कोविड-१९ चाचणी करून घ्या. (Health suffering from persistent cough these 5 reasons could be behind it)

सतत खोकला येण्याची कारणं 

 

१) अस्थमा (Asthma causes)

दमा, फुफ्फुसाचा एक सामान्य आजार असून जळजळ आणि वायुमार्ग अरुंद करतो. यामध्ये कफ वाढल्याने श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होतो. दीर्घकाळापर्यंत खोकला हे या स्थितीच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे. ऋतू आणि इतर घटकांवर अवलंबून दम्याच्या लक्षणांची तीव्रता आणि वारंवारता बदलू शकते.

किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट

२) व्हायरल संक्रमण (Viral Infection)

तुम्हाला अलीकडेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला असेल तर तुमचा सततचा खोकला त्याचा परिणाम असू शकतो. फ्लू, न्यूमोनिया इत्यादी संसर्गामध्ये, खोकला, थकवा यासारखी लक्षणे बरे झाल्यानंतरही कायम राहू शकतात.

जेवल्यानंतर लगेचच लघवीला जाता? ६ आजाराचं कारण ठरू शकते ही सवय

३) पोस्टनेजल ड्रिप (Post nasal drip)

कफ जास्त प्रमाणात जमा झाल्यानं घसा खवखवू शकतो. यामुळे चिडचिड आणि सतत खोकला होऊ शकतो. त्याला अप्पर एअरवे कफ सिंड्रोम असेही म्हणतात.

४) सीओपीडी (COPD)

क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, सामान्यतः सीओपीडी म्हणून ओळखला जातो, हा फुफ्फुसाचा रोग आहे जो वायुमार्गात बाध आणतो. या आजाराचे लक्षण म्हणजे सततचा खोकला. ज्यामध्ये खोकला कोरडा किंवा कफचा समावेश असू शकतो.

५) पचनासंबंधी समस्या (Digestion Issue) 

हे तुम्हाला आश्यर्चकारक वाटेल पण पाचन समस्यांमुळे सतत खोकला जाणवू शकतो. (जीईआरडी), ज्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग किंवा फक्त ऍसिड रिफ्लक्स असेही म्हणतात, हा एक असा आजार आहे जो पोटातून अन्ननलिकेमध्ये गॅस्ट्रिक ऍसिडचा प्रवाह बिघडवते. त्यामुळे घसा खवखवतो आणि सतत खोकला होतो.

टॅग्स : कोरोना वायरस बातम्याआरोग्यहेल्थ टिप्सओमायक्रॉन