Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > खूप कफ झालाय, ढास लागते, झोप नाही? करा डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय, कफ होईल कमी

खूप कफ झालाय, ढास लागते, झोप नाही? करा डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय, कफ होईल कमी

Cough Relief Doctor Josh axe Shared Chest Rub Recipe : या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अमेरिकन डॉक्टर joshaxe यांनी घरच्याघरी करता असा उपाय सांगितला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:07 PM2022-12-13T12:07:12+5:302022-12-13T15:41:03+5:30

Cough Relief Doctor Josh axe Shared Chest Rub Recipe : या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अमेरिकन डॉक्टर joshaxe यांनी घरच्याघरी करता असा उपाय सांगितला आहे.

Cough Relief : Doctor josh axe shared chest rub recipe to treat cough chest pain cold sinus and improve breathing | खूप कफ झालाय, ढास लागते, झोप नाही? करा डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय, कफ होईल कमी

खूप कफ झालाय, ढास लागते, झोप नाही? करा डॉक्टरांनी सांगितलेला १ उपाय, कफ होईल कमी

हिवाळ्यात रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यानं संक्रमणाचा सामना करावा लागत. परिणाम सर्दी, खोकला,  घसा खवखवणं , फुफ्फुसांमध्ये कफ जमा होणं, एलर्जी, अंगदुखी, मांसपेशीत वेदना जाणवतात. हिवाळ्यात  लहान मुलं आणि वयस्कर लोकांच्या तब्येतीकडे अधिक लक्ष द्यावं लागतं छातीत दुखणं, सर्दी, खोकला होणं या समस्या खूपच कॉमन झाल्या आहेत. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अमेरिकन डॉक्टर Joshaxe यांनी घरच्याघरी करता असा उपाय सांगितला आहे. (Doctor Josh axe Shared Chest Rub Recipe)

 हिवाळ्यात, छातीत कफ जमा झाल्यानं  श्वासोच्छवासाचा त्रास, सतत खोकला, छातीत कफ जमा होणे आणि वेदना यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. हा उपाय केवळ तुम्हाला आराम देत नाही तर हानिकारक रसायनांपासून आराम देतो. जर तुम्हाला छातीच्या समस्येमुळे श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल किंवा श्वसनाच्या इतर समस्या असतील तर हे घरगुती बाम तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकते.

यामध्ये असलेले सुगंधी तेल श्वासोच्छवासाचा त्रास दूर करून श्वास घेणे सोपे करते. त्यात असलेले पेपरमिंट आणि निलगिरीचे आवश्यक तेले तुम्हाला श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात. त्यात पेपरमिंट इसेंशियल ऑईलचा वापर केला जातो, ज्यामुळे तुम्हाला स्नायू दुखणे, सायनस, डोकेदुखी आणि मळमळ यापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे, निलगिरीचे इसेंशियल ऑईल कफ काढून टाकण्यासाठी, विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी आणि सर्दी आणि फ्लूची लक्षणे कमी करण्यासाठी कार्य करते.

चेस्ट रब बनण्याची पद्धत

1/4 कप ओलिव ऑईल

1/2 कप नारळाचं तेल

1/4 कप मध

1 काचेची बरणी

20 थेंब पेपरमिंट एसेंशियल ऑयल

20 थेंब नीलगिरीचे एसेंशियल तेल

कृती

एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल आणि मध घाला. एका भांड्यात २ इंच पाणी टाका आणि मंद आचेवर गरम करा. पॅनमध्ये तेल वितळू द्या. तेल घालण्यापूर्वी मिश्रण थोडे थंड होऊ द्या. तयार मिश्रण एका डब्यात टाका आणि सेट होऊ द्या.

 

Web Title: Cough Relief : Doctor josh axe shared chest rub recipe to treat cough chest pain cold sinus and improve breathing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.