पावसाळा म्हटलं की मलेरियापासून ते हेपेटायटीस तसेच लेप्टोस्पायरोसिस पर्यंतच्या आजार पसरतात. सध्या गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अंगदुखी, अशक्तपणामुळे दैनंदिन कामं करताना अडचण येते. डिहायड्रेशन आणि थकवा जाणवतो आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल होतात. डॉ. हनी सावला (अंतर्गत मेडिसिन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल) यांनी पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी अधिक माहिती दिली आहे. (Cough & Runny Nose Home Remedy)
पावसाळ्यात आपण पावसाळ्याचा आनंद लुटताना आपली काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. या काळात खोकला, सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असून ते संसर्गजन्यही आहे. (Home remedies for common cold) काम करणार्या लोकांनी सुट्टी घेणे किंवा घरून काम करणे निवडले पाहिजे आणि पालकांनी बाधित मुलांना शाळेत पाठवू नये. ( How do you get rid of runny nose and cough fast)
1) मलेरियाचा प्रसार डासांद्वारे होतो, त्यामुळे आपल्याला डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांपासून (साचलेले किंवा सांड पाणी) पासून दूर राहावे आणि घरामध्ये किंवा बाहेर कीटकनाशकांचा वापर करावा. मलेरियानंतर, 14 दिवस टिकणारे रोगप्रतिबंधक औषध डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे.
2) डेंग्यू हा दिवसा डासांमुळे पसरतो. ते ड्रम, भांडी किंवा बांधकाम साइटवर पाणी गोळा करण्याच्या ठिकाणी प्रजनन करतात. त्यामुळे बांधकाम स्थळांसाठी कठोर नियम लागू करावेत. तसेच ड्रेनेज किंवा दूषित पाण्यात चालणे टाळा, जर तुम्ही या घाणेरड्या पाण्यातून गेला असाल तर योग्य वेळी उपचार करा. विशेषत: मधुमेही रुग्ण किंवा ज्यांच्या पायात जखमा झाल्या आहेत, त्यांनी या ऋतूत पायांची विशेष काळजी घ्यावी.
3)सर्व रंगांच्या भाज्या आणि फळांचा समावेश असलेला निरोगी आहार घेणे महत्त्वाचे आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम आणि योगासने आवश्यक आहेत.
4)पाणी उकळून प्याव तसेच रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाऊ नये आणि पावसात अनवाणी चालु नये. रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ तसेच बर्फ आणि बाहेरील नळाचे पाणी प्यायलामुळे तुम्हाला जुलाब, उलट्या किंवा इतर समस्या ना तोंड द्याव लागेल म्हणूनच तुम्ही पीत असले ले पाणी जंतुनाशक आहे कि नाही ह्याची खात्री करूनच पाणी प्याव. जंतूपासून मुक्त होण्यासाठी, आपण पाणी 3 मिनिटे उकळवा आणि नंतर ते थंड होऊ द्या.
5) प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान मलेरियासारख्या संक्रमणास प्रतिबंध करणारी औषधे घ्या. तसेच तुम्ही कुठेही जात असाल तर तुमचे पाय पूर्णपणे झाकून ठेवणारे बूट घाला कारण वाळू किंवा मातीत कुत्रा किंवा मानवी कचऱ्याचे अंश असू शकतात. तसेच ज्या ठिकाणी चांगले प्लंबिंग नाही किंवा शौचालयाचे पाणी टाकण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करत नाही अशा ठिकाणी तुम्ही अनवाणी चालत असाल तर कीटकांचा संसर्ग होऊ शकतो म्हणूनच बूट घालावे.
6) कीटका पासून संरक्षणासाठी डीत (DEET) किंवा पिकारिडिन नावाचे रसायन असलेले बग स्प्रे वापरा. तसेच आपण कीटकांच्या चाव्यापासून संरक्षण करणारे कपडे देखील घालावेत.