संयोगिता ढमढेरे
लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोविडची लागण होतेय. दोन डोस घेतल्यानंतरही नवीन स्वरूपातल्या विषाणूसाठी बुस्टर डोस घ्यावा लागणार. विषाणूंच्या सर्व बदलत्या रुपांवर लस प्रभावी ठरणार नाही अशा एक ना अनेक बातम्या सारख्या धडकत असतात त्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडतो की लस घेतली तरी आपण पुरेसे सुरक्षित नाही का? लस घेतल्यामुळे निर्धास्त होऊ पाहणाऱ्या लोकांना नक्की आपण लस कशासाठी घेतली असाही प्रश्न पडतो.
पण अस्वस्थ होऊ नका. कोविड १९ लसी सुरक्षित, प्रभावी आणि जीवरक्षक आहेत हे सिद्ध झालेलं आहे. पण इतर कोणत्याही लसीप्रमाणे कोविड लस प्रत्येकाचा कोविडपासून १०० टक्के बचाव करू शकत नाही. तसेच लस घेतलेली व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होण्यास प्रतिबंध करण्यास लस किती प्रभावी ठरते हे अजून समजू शकलेलं नाही. त्यामुळे लस घेणं जसं आवश्यक आहे तसंच कोविडचा सामना करण्यासाठी मुखपट्टी वापरणं, सुरक्षित अंतर राखणं आणि वारंवार हात स्वच्छ करणे हे कोविड सुसंगत वर्तन चालू ठेवलं पाहिजे.
लसीचा प्रभाव आणि परिणामकारता
जागतिक आरोग्यसंस्था मान्यताप्राप्त सर्व कोवीड लसींच्या गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता पडताळणीच्या पुरेशा चाचण्या झाल्या आहेत. ५० टक्क्याहून अधिक प्रभावी असलेल्या लसीनांच मान्यता मिळालेली आहे. मान्यता मिळाल्यानंतरही या लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता यावर सातत्याने देखरेख केली जात आहे.
प्रभाव आणि परिणामकारकता यात काय फरक आहे?
नियंत्रित क्लिनिकल चाचण्यांमध्ये लसीचा प्रभाव मोजला जातो. लस घेतलेल्या किती लोकांमध्ये ज्या आजाराची लस दिली आहे त्याची निष्पत्ती दिसली आहे. ज्या लोकांना नकली लस दिली आहे त्याच्यापैकी कितीजणांवर समान परिणाम झाला आहे याच्याशी तुलना केली जाते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गटातील आजारी लोकांच्या संख्येची तुलना केली जाते. त्यानुसार लोकांनी लस घेतली किंवा घेतली नाही तर तुलनेने आजारी पडण्याचा धोका मोजला जातो. त्यावरून आपल्याला लसीचा प्रभाव किती आहेत ते कळतं. म्हणजे लस घेतल्यामुळे आजारी पडण्याचा धोका किती कमी होतो. लसीचा प्रभाव जास्त असेल तर लस घेतलेल्या लोकांना लस घेतलेल्या लोकांपेक्षा आजार होण्याचा धोका खूप कमी असतो.
उदाहरणार्थ लस ८० टक्के प्रभावी आहे असं आढळली याचा अर्थ त्या लसीच्या क्लिनिकल चाचणीत सहभागी झालेल्या लोकांमध्ये ज्यांना लस दिली गेली त्यांना लस न घेतलेल्या लोकांपेक्षा आजार होण्याचा धोका ८० टक्क्याने कमी झाला. ज्या लोकांना लस दिली आणि ज्यांना दिली नाही या दोन गटातल्या आजारी पडलेल्या व्यक्तींच्या संख्येची तुलना करून ही टक्केवारी मोजली जाते. ८०% प्रभावी म्हणजे लस घेतलेल्या २० टक्के व्यक्ती आजारी पडणार असा त्याचा अर्थ होत नाही.
लसीचा प्रभाव – याचा संदर्भ आदर्श परिस्थितीत म्हणजे नियंत्रित क्लिनिकल चाचण्यांच्या वेळी लसीची कामगिरी कशी आहे याच्याशी आहे.
तर लसीची परिणामकारकता याचा संदर्भ व्यापक लोकसंख्येत लसीची कामगिरी कशी आहे हा आहे.
लसीचा प्रभाव ८० टक्के आहे म्हणजे फक्त ८०% वेळा लस प्रभावी असेल असा त्याचा अर्थ होत नाही. याचा अर्थ लस घेतलेल्या व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आल्यास ८० टक्के व्यक्तीना आजार होण्याची कमी शक्यता आहे.
लसीची परिणामकारकता ही वास्तव जगात लसीची कामगिरी किती चांगली आहे यावरून मोजली जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये विविध वयोगटातील, विविध वैद्यकीय परिस्थिती आणि वांशिक ओळख असलेले स्त्री-पुरुष सामील असतात पण ते जगातील लोकसंख्येचं हुबेहूब प्रतिनिधित्व करत नाहीत. क्लिनिकल चाचण्यांच्या वेळी दिसलेले विशिष्ट निष्कर्ष यावर लसीचा प्रभाव मोजला जातो. सर्व समुदायांचं संरक्षण करण्यात लसीची कामगिरी काय आहे यावर लसीची परिणामकारकता मोजली जाते. प्रत्यक्ष जगातील व्यक्तीवर होणारा लसीची परिणामकारकता आणि नियंत्रित वातावरणात लसीच्या प्रभावामध्ये फरक असतो कारण प्रत्यक्ष जीवनात खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या व्यक्ती समुहात लस किती प्रभावी ठरेल याचं अचूक भाकीत करता येत नाही.
लसीचं संरक्षण आणि वेळा..
लसीमुळे मजबूत संरक्षण मिळतं पण ही सुरक्षा तयार होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पूर्ण प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी लोकांनी आवश्यक तेवढ्या मात्रा घेणं आवश्यक आहे. दोन मात्रेची लस असेल तर एका मात्रेमुळे काही प्रमाणात संरक्षण मिळेल आणि दुसऱ्या मात्रेनंतर ते वाढेल. सुरक्षेची कमाल पातळी गाठण्यासाठी दुसरी मात्रा घेतल्यानंतर काही आठवडे जावे लागतात.
लसीचं संरक्षण आणि संसर्ग
अनेक लोकांना लस आजारी पडण्यापासून रोखते पण प्रत्येकाला रोखू शकत नाही.
एखाद्या व्यक्तीने नेमून दिलेल्या लसीच्या मात्रा घेतल्या आणि प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी काही आठवडे वाट पाहिली तरी त्याला लागण होण्याची शक्यता राहतेच. लस कोविड संसर्ग न होण्याची १०० टक्के हमी देत नाही त्यामुळे लसीच्या दोन मात्रा घेऊनही संसर्ग होऊ शकतो.
मात्र लस घेतलेले लोक आजारी पडले तरी त्यांची लक्षण सौम्य असतील आणि त्यांना गंभीर आजार किंवा मृत्यू होण्याची शक्यता दुर्मिळ असेल. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोविड प्रतिबंधाच्या सवयी तशाच चालू ठेवा.
(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि
युनिसेफचा संयुक्त उपक्रम)