आपल्या जीवनात दुधाचे (Milk Benefits) अनन्यसाधारण महत्व आहे. जन्म घेताच आईचे दूध आपल्यासाठी संजीवनी म्हणून काम करते. नंतर वय वाढल्यानंतर आपण आईचं दूध सोडून, गाय किंवा म्हशीचं दूध पितो. दूध पिण्याचे महत्व आपल्याला आई-वडिलांकडून मिळाले असतीलच. नियमित दूध प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सुटतात. पण दूध नेमकं कोणतं प्यावं? हा ही प्रश्न निर्माण होतो?
गायीचं की म्हशीचं कोणतं दूध प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो? सध्या भेसळयुक्त दुधामुळे कोणतं दूध आरोग्यासाठी योग्य याची माहिती आपल्याला नसते (Health Benefits). दुधात भेसळयुक्त पदार्थ मिसळून दुधातील पोषकता कमी केली जाते. त्यामुळे बरेच जण गायीचं दूध पितात. तर काही जण म्हशीचं दूध घट्ट असल्यामुळे गायीऐवजी म्हशीचं दूध पितात. दोन्ही दूध प्यायल्याने आरोग्याला फायदाच होतो. पण आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणतं? याबद्दलची माहिती फिट क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ सुमन यांनी दिली आहे(Cow Milk vs Buffalo Milk: Which is better for health).
कोणतं दूध फायदेशीर गायीचे की म्हशीचे?
ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, गायीचे दूध शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. हे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पातळ असून लवकर पचते. यामध्ये प्रोटीन, अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी, १२, पोटॅशियम आढळतात. गायीचे दूध पचायला हलके असल्यामुळे सहसा लोकं लहान मुलांना आणि वृद्धांना गायीचे दूध प्यायला देतात.
हिवाळ्यात सर्दी खोकला नको तर खा हे फळ, २० रुपये खर्चात पचनही सुधारेल झटपट
म्हशीचे दूध गाईच्या दुधापेक्षा जाड, मलईदार आणि फिकट पिवळ्या रंगाचे असते. यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. शिवाय यात झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी२ आणि व्हिटॅमिन सी देखील आढळते. नियमित म्हशीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होतेच, शिवाय ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहते. दुधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दूध पिण्याचे फायदे
आपण वडीलधाऱ्यांकडून दूध हे संपूर्ण आहार असल्याचं नक्कीच ऐकलं असेल. त्यात प्रथिनांसह अमीनो ऍसिड असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यासह डॅमेज झालेल्या सेल्स बरे करतात. दुधाचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहते.
हांडासाठी फायदेशीर
दुधात कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डी, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडांचे आजार ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होतो. रोज दूध प्यायल्याने शरीर मजबूत होतेच, पण मुख्य म्हणजे शरीराचा योग्य विकास होण्यास मदत होते.
मेंदूसाठी फायदेशीर
दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण तर होतोच पण स्मरणशक्तीही वाढते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन बी आणि बी १२ स्मरणशक्ती आणि मेंदूचा विकास करण्यास मदत करते. मुलांना नियमित दूध प्यायला दिल्याने मेंदूची वाढ होते आणि शरीरही निरोगी राहते.
विसरभोळेपणा वाढतोय का, नावं-गोष्टी लक्षात राहत नाहीत? ५ टिप्स-स्मरणशक्ती वाढेल कायमची
हृदयासाठी निरोगी
दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. नियमित दूध प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदय निरोगी राहते.