गायीचं की म्हशीचं कोणाचं दूध (Milk for Health) आरोग्यासाठी उत्तम? याचं उत्तर कदाचित कमी लोकं देऊ शकतील. कारण दोन्ही दूध आपल्या पौष्टीक मुल्यांनी श्रेष्ठ आहेत. अनेक जण गायीचं दूध पिण्यास प्राधान्य देतात. त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ सारखे पोषक घटक असतात. गायीच्या दुधाचे सेवन केल्याने हाडांना मजबुती मिळते. तसेच ते स्नायूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरते.
म्हशीच्या दुधातील फॅट ग्लोब्यूल्स आकाराने मोठे असतात. त्यामुळे हे दूध लवकर पचत नाही. शिवाय त्यात फॅट्सचे प्रमाण जास्त असते. जर आपल्याला वेट लॉस करायचं तर, म्हशीऐवजी गायीचं दूध प्या (Health Tips). पण कॅल्शियमचे प्रमाण कोणत्या दुधात जास्त असते? हे आपल्या ठाऊक आहे का? कॅल्शियम हवंय तर, कोणतं दूध फायदेशीर ठरेल?(Cow Milk vs Buffalo Milk: Which one is a better source of Calcium).
अनिल कपूरच्या चिरतारुण्याचं सिक्रेट काय? स्वत: अनिल कपूरनेच सांगितला सोपा-स्वस्त डाएट प्लॅन
एनआयएचच्या संशोधनानुसार, '२५० मिलीलिटर म्हशीच्या दुधात ४१२ मिलीग्राम कॅल्शियम असते. यासह त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि क्लोराईड देखील असते. दुधातील निरोगी फॅट्स हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. तर, एक कप गायीच्या दुधात ३०५ मिलीग्राम कॅल्शियम असते. यासह यात प्रथिने, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे गायीच्या तुलनेत म्हशीच्या दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. जे हाडांची मजबुती, यासह संपूर्ण आरोग्याच्या उत्तम वाढीसाठी मदत करते.'
ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास- रात्रभर झोप नाही? ४ पैकी फक्त एक गोष्ट पाण्यात घालून प्या
उच्च कोलेस्टेरॉलग्रस्त लोकांनी कोणते दूध टाळावे?
म्हशीच्या दुधातील बीटा-लैक्टोग्लोबुलिन आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीच्या बाबतीत, म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल असते, म्हणून, पिसिओडी, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.