Join us   

पायांना भेगा पडल्यात, रक्तही निघतं? ५ उपाय , मलम न लावता पाय मऊ-कोमल राहतील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 4:01 PM

Crack heels solution : सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह उपाय म्हणजे एलोवेरा जेल. रोज रात्री पायांमध्ये मोजे घालून झोपा. ज्यामुळे  टाचांना भेगा पडणार नाहीत. 

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते आणि टाचांना भेगा पडतात. काही लोकांच्या टाचा इतक्या खराब होतात की त्यातून रक्त येऊ  लागतं ज्यामुळे चालणं फिरणं कठीण होतं (Crack heels solution).  जर तुम्हालाही  थंडीच्या दिवसांत अशा त्रासातून जावं लागत असेल तर तुम्ही काही सोपे उपाय समजून घ्यायला हवेत. ज्यामुळे भेगा कमी करण्यास मदत होईल. पायांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही चपला कोणत्या वापरता त्याकडे लक्ष द्यायला हवं. अशी बुटं किंवा चपला निवडा ज्यामुळे पायांना आरामदायक वाटेल. (Crack heels  Home Remedies)

जास्त हिल्सच्या चपला, घट्ट शूज, सॅण्डल, कडक सोल असलेले फुटवेअर्स वापरणं टाळा. जखम बरी करण्यासाठी तसंच संक्रमणापासून  बचावासाठी तुम्ही पातळ पट्टी लावू शकता.  कोणत्याही औषधांच्या दुकानात किंवा ऑनलाईन काऊंटरवर या चपला तुम्हाला सहज मिळतील (Ref). नियमित पायांना मलम किंवा लोशन लावून ठेवा,  ज्यामुळे टाचा सॉफ्ट होतील. स्वत:ला हायड्रेट ठेवा, जास्तीत जास्त पाणी प्या. 

१) जर तुमच्या टाचा भरपूर खराब झाल्या असतील तर रोज रात्री टाचांना नारळाचं तेल लावून ठेवा. असं केल्यानं 1 ते २ दिवसांत टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

२) मध आणि लिंबाचे मिश्रण तुम्ही टाचांना लावू शकता. कारण मधात नॅच्युरल मॉईश्चरायजिंग गुण असतात. मधात एंटीसेप्टीक गुण असतात. ज्यामुळे टाचा मऊ, मुलायम राहतात.

३) व्हिनेगर आणि मीठाचा वापर करून तुम्ही टाचांना भेगा पडण्यापासून रोखू शकता.  यासाठी गरम पाण्यात हे २ पदार्थ मिसळून पाय धुवा. या पाण्यात  पाय ठेवल्यानं पाय मऊ होतील आणि मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल.

रोज सकाळी तोच त्रास, पोट साफ होत नाही? ‘या’ पोझिशनमध्ये बसा, पोट होईल साफ काही मिनिटांत

४) उळलेल्या बटाट्यात थोडं दूध एकत्र करा. त्यानंतर ही पेस्ट पायांना लावा. ३० मिनिटं लावल्यानंतर पाय धुवून घ्या. या उपायानं टाचांना भेगा पडण्यापासून रोखता येईल.

रोज फक्त १ आवळा या पद्धतीनं खा; १० आश्चर्यकारक फायदे, पचनाचे त्रास दूर-चेहऱ्यावर येईल ग्लो

५) सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह उपाय म्हणजे एलोवेरा जेल. रोज रात्री पायांमध्ये मोजे घालून झोपा. ज्यामुळे  टाचांना भेगा पडणार नाहीत. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य