अनेकांना सतत बोटं मोडण्याची सवय असते. सतत बोटं मोडणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकराक ठरू शकतं. अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार सतत बोटं मोडल्यानं हाडांचे त्रास उद्भवू शकततात. अनेकदा बोटं मोडल्यानंतर त्यातून आवाजही येतात. हे हाडांच्या आजाराचं लक्षण असू शकतं. ( Never crack your fingers joint pain and arthritis disease will harm you)
बोटं मोडल्यानं आर्थरायटिसची समस्या वाढते असं अनेकांचे म्हणणे आहे. बोटं मोडताना जी प्रक्रिया होते तिच ज्वाईंट्स मोडल्यानंतरही होते. शरीराच्या ज्वाईट्समध्ये एक फ्लूईड असते, ज्यामुळे बोटं मोडता येतात. ज्वाईंट्समधील फ्लूईडमधून गॅस रिलीज होतो. यामुळे आतील बबल्स फुटतात आणि बोट मोडण्याचा आवाज येतो. अनेकदा सांध्यांमधूनही असाच आवाज येतो.
तज्त्र काय सांगतात?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बोटं जास्त वेळा मोडल्यानं हाताच्या ग्रिप स्ट्रेंथवर परिणाम होतो आणि त्यामुळे हाताला सूजही येऊ शकते. त्यामुळे बोटं मोडू नये. तज्ज्ञांचे मत आहे की जर तुम्ही बोटे मोडली असतील आणि तुम्हाला वेदना होत नसतील तर ते ठीक आहे. पण सतत बोटं मोडण्याच्या सवयीमुळे आर्थरायटिस होण्याचा धोका असतो.
बोटं मोडणं अनुवांशिक असू शकतं का?
बोट मोडण्याची सवय अनुवांशिक नाही. पण काही दुखणी मात्र अनुवांशिक असू शकतात. अनेकांना बोटं मोडल्यानंतर रिलॅक्स वाटते. मात्र सांधेदुखीचा त्रास किंवा वेदना होत असल्यास बोटं मोडू नका. यामुळे बोटांमध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे बोटांना दुखापत होण्याची शक्यता असते.
बोटं मोडण्याची सवय कशी सोडायची
१) कामं करताना बोटांकडे लक्ष देऊ नका, बोटं मोडायची सवय सोडायची असेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवा.
२) जपमाळ हातात घ्या. अनेकदा जपमाळ केल्यामुळे देखील आपले मन आणि हात सतत बिझी राहतात. त्यामुळे आपोआप तुमची बोटं मोडण्याची सवय कमी होते.