Join us   

जेवणानंतर फक्त १ चमचा 'या' बिया खा; कोलेस्टेरॉल-बीपी कंट्रोलमध्ये येईल; पोट नीट साफ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 11:33 AM

Cucumber Seeds Health Benefits : काकडीच्या बिया ओरल हेल्थसाठी चांगल्या मानल्या जातात. ज्यामुळे तोंडात दुर्गंध येत नाही.

काकडी (Cucumber) आरोग्यासाठी बरीच फायदेशीर मानली जाते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. काकडीच्या बिया खाण्याचेही अनेक फायदे आहेत. मार्केटमध्ये काकडीच्या बिया सहज मिळतात. तुम्ही पिकलेल्या काकडीच्या बिया घरीसुद्धा काढू शकता. (Cucumber Seeds Benefits) काकडीच्या बियांचा सुपरसिड्समध्ये समावेश होतो. काकडीच्या बियांमध्ये हायड्रो अल्कोहोलिक आणि ब्युटेनॉलिक कंम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात ते समजून घेऊ. (Cucumber Seeds In These Disease Help To Reduce High Cholesterol Level)

2010 च्या अभ्यासानुसार काकडीत एंटी ऑक्सिडंट्स प्रॉपर्टीज असतात. यात फ्लावनॉईड्स आणि टॅनिस असते. ज्यामुळे फ्रि रॅडिकल्सपासून बचाव होण्यास मदत होते. शरीर पूर्णपणे हायड्रेट राहते. काकडीमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास  मदत होते. ज्यामुळे डायबिटिसशी निगडीत समस्या टाळण्यासही मदत होते. (Ref) आहारात काकडीचा  समावेश केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. 

१ महिन्यात ४ किलो वजन कमी करा-आहारतज्ज्ञांनी सांगितलं खास डाएट; मेंटेन राहण्याचं साधं सिक्रेट

कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहते

काकडीच्या बिया खाल्ल्याने शरीराला पॉलीअन्सॅच्युरेडेट एसिड्स मिळतात. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करता येते. काकडीच्या बियांमध्ये पोषक तत्व असतात ज्यामुळे ब्लड वेसल्स  साफ करण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. हार्ट अटॅक स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी करता येतो. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज 2 चमचा काकडीच्या बियांचे सेवन करा. ज्यामुळे हार्ट हेल्थमध्ये सुधारणा होते.

पचनक्रिया चांगली राहते

काकडीमुळे अपचनाची समस्या दूर होते. जर तुम्हाल कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर आहारात काकडीचा समावेश करा . काकडीच्या बियांमध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनानं बॉवेल मुव्हमेंटमध्ये सुधारणा होते ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवत नाही.  तुम्ही काकडीच्या बिया काढूनही खाऊ शकता किंवा ज्यूस, स्मूदी बनवून याचे सेवन करा.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

काकडीच्या बिया त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतात.याचे स्क्रब तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे स्किन हायड्रेट राहण्यास मदत होते. काकडीच्या बियांचा वापर तुम्ही वेगवेगळ्या प्रकार करू शकता. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. या बियांमध्ये व्हिटामीन्स आणि मिनरल्स असते ते केसांसाठी टॉनिकप्रमाणे काम करते.

मुलांचा मेंदू तल्लख होईल-स्मरणशक्ती वाढेल; रोज ५ पदार्थ खायला द्या, शार्प माईंड होईल

तोंडात दुर्गंधी येत नाही

काकडीच्या बिया ओरल हेल्थसाठी चांगल्या मानल्या जातात. ज्यामुळे तोंडात दुर्गंध येत नाही. काकडीच्या बियांमध्ये एंटीबॅक्टेरिअल तत्व असतात ज्यामुळे  तोंडातील दुर्गंध आणि कॅव्हिटीज कमी होतात. काकडीच्या बिया माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करतात.

काकडीच्या बिया युटीआयच्या समस्येवरही फायदेशीर ठरतात. काकडीच्या बिया शरीराला हायड्रेट ठेवतात ज्यामुळे पीएच बॅलेन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते. काकडीच्या बियांमध्ये एंटीमायक्रोबियल गुण असतात. ज्यामुळे संक्रमणापासून लढण्यास मदत होते. या बिया थंड असतात. ज्यामुळे युटीआय इन्फेक्शनचा त्रास कमी होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स