शरीर हेल्दी ठेवण्यासाठी पचनक्रिया चांगली ठेवणं खूप महत्वाचे असते. ज्यामुळे शरीरात खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते, शरीरातून अतिरिक्त पदार्थ निघून जातात आणि शरीराल एनर्जी, न्युट्रिएंटस मिळतात. हेल्दी राहण्यासाठी ते फार आवश्यक आहे. (Solution For Gas Problem) जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर संपूर्ण शरीरावर याचा परिणाम होतो.
जर तुम्ही जास्त वेळ उपाशी राहीलात तरीसुद्धा गॅस, एसिडीटीचा सामना करावा लागतो स्वंयपाक घरातले 2 मसाले वापरून तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवता येईल, आहारतज्ज्ञ नंदिनी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या एक डाएटिशियन आणि सर्टिफाईड ट्रेनर आहेत. (Cumin seeds and funnel seeds effective in the problem of constipation gas health benefits of cumin)
1) जिऱ्याचं पाणी
रिसर्चनुसार जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं पोटातील अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. आयुर्वेदाच्या दृष्टीनंही जिऱ्याचं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. जिऱ्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जिंक, फायबर्स, व्हिटामीन सी, कॉपर, एंटीऑक्सिडेटंस असतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते (Ref). तुम्ही दोन प्रकारे जिऱ्याचं सेवन करू सकता. जीरं पावडर बनवण्यासाठी थोडं जीरं तव्यावर भाजून वाटून घ्या, नंतर १ चमचा पावडर १ ग्लास गरम पाण्यात मिसळून या पाण्याचे सेवन करा किंवा जीरं पाण्यात भिजवून सकाळी गाळून घ्या. ते पाणी उकळवून याचे सेवन करा.
डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील
2) बडिशेपेचं पाणी
गॅस आणि एसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपेचं सेवन करू शकता. बडिशेपे खाल्ल्यानं छातीत जळजळ होणं, पचनक्रियेसंबंधित त्रास दूर होण्यास मदत होते. बडीशेपेतील एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण पोटातील सूज, जळजळ कमी करतात ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. शरीरातील पित्त बॅलेंन्स राहते आणि पोटाला गारवा मिळतो याशिवाय एसिडीटी, पोटाचे त्रासही उद्भवत नाहीत.
बडीशेपेच्या पाण्यात पोटातील गॅस्ट्रीक एसिड कमी करण्याचे गुण असतात ज्यामुळे छातीतील जळजळ दूर होते. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्याचं पाणी प्यायल्यानं पोट साफ राहते. एक ग्लास पाण्यात एक चमचा बडिशेप घालून काहीवेळासाठी तसंच ठेवून द्या नंतर उकळून या पाण्याचे सेवन करा.