Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थकवा-अशक्तपणा जाणवतो? दह्यात 'हा' पदार्थ मिसळून खा, वाढेल हाडांची ताकद-मजबूत होईल शरीर

थकवा-अशक्तपणा जाणवतो? दह्यात 'हा' पदार्थ मिसळून खा, वाढेल हाडांची ताकद-मजबूत होईल शरीर

Curd And Cinnamon Benefits Health Benefits : दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:16 PM2024-08-28T12:16:20+5:302024-08-28T16:58:20+5:30

Curd And Cinnamon Benefits Health Benefits : दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात

Curd And Cinnamon Benefits Health Benefits For Weight Loss Diabetes PCOS Hight Blood Pressure And Strong Bones | थकवा-अशक्तपणा जाणवतो? दह्यात 'हा' पदार्थ मिसळून खा, वाढेल हाडांची ताकद-मजबूत होईल शरीर

थकवा-अशक्तपणा जाणवतो? दह्यात 'हा' पदार्थ मिसळून खा, वाढेल हाडांची ताकद-मजबूत होईल शरीर

दालचिनी आणि दही मिसळून खाल्ल्यानं महिलांच्या  आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दालचिनी ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली होण्यास मदत होते. ज्यामुळे पीसीओएस यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. (Curd And Cinnamon Benefits Health Benefits For Weight Loss Diabetes PCOS Hight Blood Pressure And Strong Bones)

न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल यांच्या मते दालचिनीत (Dalchini) एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात याशिवाय यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे हॉर्मोन रेग्युलेशन करण्यास मदत होते. दह्यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. ज्यामुळे हॉर्मोन्स कंट्रोल राहण्यास मदत होते. या दोन्ही पदार्थांचे कॉम्बिनेशन शरीरासाठी उत्तम ठरते. (Health Tips)

हाडं मजबूत राहण्यास मदत होते

कॅल्शियमनी परीपूर्ण दह्यामुळे हाडं मजबूत राहण्यास मदत होते. दह्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया चांगली ठेवतात. दह्यातील एंटी ऑक्सिडेंट्स इम्यूनिटी मजबूत करतात. दालचिनी  इंसुलिन संवेदनशिलता वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल होण्यास मदत होते. (Ref) दालचिनीत एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सूज कमी होते. दालचिनी हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

दही आणि दालचिनी दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. दह्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. दालचिनी मेटाबॉलिझ्म वाढून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. दही शरीराला प्रोबायोटिक्स प्रदान करतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. याच्या नियमित सेवनाने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. दालचिनी दह्याबरोबर मिसळून खाल्ल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. 

PCOS  असलेल्या महिलांसाठी हे कॉम्बिनेशन फायदेशीर ठरते. याच्या सेवनानं इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढवण्यास मदत होते. दालचिनीमध्ये पीसीओएसची लक्षणं कमी करण्याची क्षमता असते ज्याच्या सेवनाने मासिक पाळी रेग्युलर होण्यासही मदत होते. दालचिनी ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास मदत करते ज्यामुळे इंसुलिन सेंसिटिव्हीटी चांगली राहते. डायबिटीसचा धोका कमी होतो. 

Web Title: Curd And Cinnamon Benefits Health Benefits For Weight Loss Diabetes PCOS Hight Blood Pressure And Strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.