Join us   

दही आणि योगर्ट यात काय फरक असतो? योगर्ट खाण्याचे फायदे कोणते? त्याने वजन कमी होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 3:51 PM

Curd Or Yogurt: Which Is Healthier And Better For Weight Loss? योगर्ट उत्तम की दही? दोघांमध्ये फरक किती, पाहा आरोग्याच्यादृष्टीने काय फायदेशीर..

दुधाला आंबवून तयार केलेला पदार्थ म्हणजे योगर्ट. योगर्ट हा पदार्थ चवीला आंबट गोड जरी असला तरी, आपल्या आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. याचा शोध तुर्कीमध्ये लागला असून, त्याचे नाव योगर्ट पडले. योगर्ट हे एक आरोग्यदायी प्रोबायोटिक आहे. त्यात प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे वृद्धापकाळात संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

वायटल स्वास्थ्यचे संस्थापक, पोषणतज्ञ आणि आहारतज्ञ, डॉ. स्मृती झुनझुनवाला यांच्या मते, ''योगर्ट आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. यासह वजन कमी करण्यासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. त्यातील जिवाणू आपल्या शरीराला उर्जा देऊन, खराब बॅक्टेरीयाला नष्ट करतात. हे बॅक्टेरीया पोट आणि पचनसंस्थेसाठीही चांगले आहे''(Curd Or Yogurt: Which Is Healthier And Better For Weight Loss?).

दही आणि योगर्टमधील फरक

दही आणि योगर्ट तयार करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. बहुतांश घरांमध्ये दही, हिरवी मिरची आणि लिंबू इत्यादी गरम दुधात घालून दही तयार केले जाते, ज्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. दुसरीकडे योगर्ट कृत्रिम किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्यामुळे त्याची चव आणि पोत अगदी वेगळे आहे.

दूध प्यायल्याने वजन वाढते की कमी होते? वजन कमी करताना दूध पिणे फायद्याचे की...

योगर्ट खाल्ल्याने वजन कमी होते

दह्यात उच्च दर्जाचे प्रथिने आढळते, ज्यामुळे अन्न लवकर पचते. यासह त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरससह अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील आढळतात. हे सर्व पोषक घटक भूक नियंत्रणात ठेवतात. ज्यामुळे वजन लवकर कमी होऊ लागते.

दररोज २ ते ३ कप योगर्टचे सेवन करा

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी दररोज योगर्ट खा. दिवसातून किमान २ ते ३ कप योगर्ट खावे. त्यातील पौष्टीक घटकामुळे शरीराला उत्तम फायदे मिळतात. यासह भूक कमी लागेल. ज्यामुळे कॅलरीज कमी होतील.

ऑफिसात सतत ओव्हर टाइम करता,तासंतास कामच करता? तुम्हाला हार्ट ॲटॅकचा धोका आहे..

उच्च रक्तातील साखर नियंत्रणात येईल

मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी योगर्ट उत्तम मानले जाते, कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. जे रक्तातील ग्लुकोज वेगाने वाढू देत नाही. याशिवाय हा पदार्थ रक्तदाब नियंत्रणात ठेवते.

कमकुवत हाडांना बळ देते

दह्यामध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडांना भरपूर प्रमाणात ताकद मिळते. त्यामुळे ज्यांची हाडे कमकुवत किंवा नाजूक आहेत, त्यांनी प्रोबायोटिक योगर्टचे सेवन नियमित करावे.

फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार

त्वचेवर अॅलर्जीची समस्या होत नाही

काही लोकांना दूध आणि दह्यामध्ये असलेल्या लैक्टोजमुळे अॅलर्जी होते. पण योगर्टमुळे अशी कोणतीही अॅलर्जी होत नाही. त्यात असलेले बॅक्टेरिया लैक्टोज पचण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त आपण लैक्टोज फ्री योगर्टचे सेवन करू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सदूधआरोग्यवेट लॉस टिप्स