वाढत्या स्क्रीन टायमिंगमुळे डोळ्यांना खाज, धूसर दिसणे, जळजळ होणे, डोळे थकल्यासारखे होणे, यासह इतर समस्या निर्माण होतात. जर आपण देखील डोळ्यांच्या निगडीत समस्येने त्रस्त असाल तर, ही लक्षणे डोळे कमकुवत होण्याची आहेत. बऱ्याचदा नकळत चष्म्याचा नंबर वाढतो (Eye Care Tips). ज्यामुळे कायमस्वरूपी चष्मा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोळे कमकुवत होऊ नये, यासह नजर तीक्ष्ण करायची असेल तर, योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी सांगितलेल्या २ टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे डोळ्यांची नजर तेज होईल, शिवाय काही महिन्यात डोळे टवटवीत-फ्रेश दिसतील(Cure for all Eye Problems - Baba Ramdev).
डोळ्यांची नजर तीक्ष्ण करण्यासाठी रामदेव बाबांचे उपाय
थंड पाण्याचा करा वापर
योगगुरु रामदेव बाबा सांगतात, 'सकाळी उठल्यानंतर तोंडात थंड पाणी घ्या, ते पण पिऊ नका. नंतर डोळे मोठे करून त्यावर थंड पाण्याचे शिंतोडे मारा. असे नियमित सकाळी उठल्यानंतर केल्याने डोळे कायम टवटवीत फ्रेश राहतील.
रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज
योगासन गरजेचं
रामदेव बाबा यांच्या मते, 'सकाळ-संध्याकाळ आपण अनुलोम-विलोग प्राणायाम करू शकता. अनुलोम-विलोग प्राणायाम केवळ डोळ्यांचे आजार दूर ठेवत नाही तर संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले ठेवते. ज्यांचे वय कमी आहे, त्या लोकांनी शिर्षासन करावे. अधिक वायोगटातील लोकांनी शिर्षासन करू नये.
यासह पहिल्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्यभागी एक एक्यूप्रेशर पॉइंट आहे, २ मिनिटांसाठी ते दाबल्याने डोळ्यांना आराम मिळतो. शिवाय निरोगी डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ
डोळ्यांच्या कमकुवतपणाची लक्षणं आणि कारणं
डोळ्यांच्या कमकुवतपणाची अनेक कारणं असू शकतात. धुसर दिसणं हे डोळ्यांच्या कमकुवतपणाचे मुख्य लक्षण आहे. बऱ्याचदा डोळ्यांची जळजळ होणं, खाज येणं, डोळे लाल होणे, डोळ्यांमधून वारंवार पाणी येणे यामुळे देखील डोळे अधिक कमकुवत होतात.
अमेरिकन ऑप्टोमॅट्रिक असोसियेशनच्या रिपोर्टनुसार, डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण आपल्या आहारात ओमेगा-३ फॅटी एसिड्सचा समावेश करू शकता. आहारात ओमेगा-३ फॅटी एसिड्सयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने डोळे चांगले राहतात. शिवाय नजर तेज होते.