Join us   

सकाळी कढीपत्त्याची २ ते ३ पाने खा, डिटॉक्ससाठी महागड्या ट्रिटमेण्टची गरजच नाही! किडनी-लिव्हर राहील ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 7:28 PM

Curry leaves benefits : आरोग्याच्या दृष्टीनेही कढीपत्ता फायदेशीर ठरतो. रोज रिकाम्यापोटी ४ ते ५ कढीपत्ते खाल्ल्याने आजारांपासून लांब राहण्यास मदत होते.

कढीपत्ता कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. यात व्हिटामीन सी, मॅग्नेशियम,आयर्न, कॉपर, कॅल्शियमस फॉस्फरस, फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्स यांसारखी पोषक तत्व असतात. पोहे, भाजी, डाळी, उपमा, भाज्यांचे वाटण या प्रत्येक पदार्थांत कढीपत्त्याचा वापर केला जातो. (Curry leaves benefits)

आरोग्याच्या दृष्टीनेही कढीपत्ता फायदेशीर ठरतो. रोज रिकाम्यापोटी ४ ते ५ कढीपत्ते खाल्ल्याने आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. अनेकजणांना सवय असते की ते पदार्थातील कढीपत्ता बाजूला काढून ठेतात. कढीपत्ता खाण्याचे हे फायदे वाचल्यानंतर तुम्ही चुकूनही कढीपत्ता बाजूला काढून फेकणार नाही. (Benefits of chewing curry leaves in the morning empty stomach)

डायबिटीस कंट्रोल राहते

डायबिटीसच्या रुग्णांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची २ ते ३ पानं चावायला हवी. यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल होते. तुम्ही  कढीपत्ते उन्हात सुकवून त्याची पावडरसुद्धा बनवू शकता.  

पोट, कंबरेच्या टायर्समुळे शरीर जाडजूड दिसतंय? घरी हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी

वजन नियंत्रणात राहतं

जे लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत त्यांनी आपल्या आहारात कढीपत्त्याचा समावेश करावा.  सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता चावल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. मेटाबॉलिझ्म वाढते आणि वजन कमी करणं सहज शक्य होतं. 

पोटदुखीपासून आराम

जर तुम्ही पोटदुखीने त्रस्त असाल तर एका पॅनमध्ये उकळतं पाणी घ्या. त्यात कढीपत्त्याची पानं मिसळा त्यानंतर पाणी उकळून अर्ध झाल्यानंतर  गाळून या  पाण्याचे सेवन करा. यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

केसांसाठी फायदेशीर

जे लोक हेअरफॉल किंवा अन्य समस्यांशी लढत आहेत त्यांनी कढीपत्ता खायला हवा. यामुळे केस मजबूत राहतात आणि हेअरफॉल होत नाही.  याव्यतिरिक्त तुम्ही कढीपत्ता वाटून केसांना लावू शकता. हा हेअर मास्क खूप फायदेशीर ठरतो.

मॉर्निंग सिकनेस कमी होतो

रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने मॉर्निंग सिकनेस येत नाही. यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि  साखर मिसळून या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे उलटी होणं,  मळमळणं यांसारख्या त्रासांपासून आराम मिळतो. 

पोट सुटले-जाडजूड मांड्या? एक सोपा डाएट प्लॅन, वाढलेली चरबी चटकन होईल कमी

लिव्हर निरोगी राहते

लिव्हरच्या समस्या दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी कढीपत्त्याचे सेवन करायला हवे. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते आणि लिव्हर डिटॉक्स होण्यास  मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य