आजकाल नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे (Bad Cholesterol) प्रमाण वाढत चालले आहे. बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर रक्ताभिसरणात अडचण निर्माण होते. ज्यामुळे हार्ट ब्लॉक किंवा हृदयाच्या (Heart problems) निगडीत गंभीर आजारांचा धोका वाढतो. नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यावर आपल्याला लवकर कळून येत नाही. पण यावर यावर लक्ष ठेवून वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. किंवा आहारात काही बदल करणं गरजेचं आहे (Health Tips).
जर नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर, आहारात कडीपत्त्याचा समावेश करा. कडीपत्त्यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. ज्याचा फायदा आरोग्याला होतो. शिवाय बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
आयुर्वेदाचे डॉक्टर कपिल त्यागी सांगतात, 'कडीपत्त्यात क्वेरसेटिन, बीटा-कॅरोटीन आणि ल्युटीन सारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि स्ट्रेस हार्मोन संतुलित करण्यास मदत करतात. त्यामुळे कडीपत्ता कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात'(curry leaves for bad cholesterol levels).
बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण होते नियंत्रित
आहारात कडीपत्त्याचा समावेश केल्याने बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. याच्या पानांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करतात.
बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात कडीपत्त्याचा समावेश करावा?
- यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मध, १० - १२ कडीपत्त्याची पानं घाला. ५ - ७ मिनिटे मंद आचेवर उकळवून घ्या. नंतर चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या. आपण हा तयार चहा रोज रिकाम्या पोटी पिऊ शकता.
- याशिवाय ८ - १० फ्रेश कडीपत्त्याची पानं आपण रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होईल. यासह हृदयाचे आरोग्यही सुदृढ राहील.
वजन कमी करण्यास मदत
कडीपत्ता वेट लॉससाठीही मदत करते. कडीपत्त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. यासह पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
पचनासाठी फायदेशीर
कडीपत्त्यामध्ये असलेले एन्झाईम्स पचनक्रिया सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता आणि पोट फुग्ण्याचा त्रास कमी होतो.